Sunday, September 13, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Rajkiy Katta by Rajkiy Katta
18 May 2026
in Blog
0
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
0
SHARES
63
VIEWS


लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून, २४ मे ते १ जून दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्यासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी अधिक तीव्र होताना दिसत आहे.
कार्यकर्त्यांचा डॉ. पाटील यांच्यावर विश्वास
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांत व्यापक जनसंपर्क असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी व सदस्यांमध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचे बोलले जात आहे. मागील निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे यावेळीही योग्य उमेदवार दिल्यास ही जागा कायम राखता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
संघटनात्मक ताकद आणि नेतृत्व
महाविकास आघाडीकडून संघटनात्मक ताकद, व्यापक जनसंपर्क आणि सक्षम नेतृत्व असलेला उमेदवार दिल्यास विजय निश्चित होऊ शकतो, असे मत पक्षांतर्गत व्यक्त होत आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून सक्षम संघटन उभे केले. तसेच धाराशिव नगरपालिकेत आठ नगरसेवक निवडून आणण्यातही त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
२०१९ च्या पार्श्वभूमीवर सहानुभूती
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आजही अनेक समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिल्यास ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजय मिळवू शकतात, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष
लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

Previous Post

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

Next Post

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491247
Users Today : 7
Users Yesterday : 89
This Month : 637
Total Users : 38612
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group