Friday, September 11, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

Rajkiy Katta by Rajkiy Katta
31 August 2026
in Blog
0
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
0
SHARES
57
VIEWS

४४ महाविद्यालयांतील ४४७ कलावंतांचा सहभाग; चार व्यासपीठांवर २४ कला प्रकारांच्या स्पर्धा

कळंब : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ व २ सप्टेंबर रोजी ‘धाराशिव जिल्हा युवा महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांमधील ४४७ विद्यार्थी कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

महोत्सवात ‘सृजनरंग’, ‘नादरंग’, ‘शब्दरंग’ आणि ‘ललितरंग’ या चार स्वतंत्र व्यासपीठांवर एकूण २४ कला प्रकारांच्या स्पर्धा रंगणार आहेत. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललितकला क्षेत्रातील विविध कलाप्रकारांमधून विद्यार्थी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणार आहेत.

युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी असणार आहेत.

तत्पूर्वी कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि कलावंत सहभागी होणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण ३३३ महाविद्यालयांपैकी धाराशिव जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांचे विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होत आहेत. एकूण ४४७ विद्यार्थी कलावंतांमध्ये २८४ विद्यार्थिनींचा समावेश असून, विद्यार्थिनींच्या सहभागाचे प्रमाण ६४ टक्के आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या जिल्हास्तरीय आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंबुरे यांनी सांगितले.

स्पर्धांचे निष्पक्ष व पारदर्शक परीक्षण करण्यासाठी जिल्ह्याबाहेरील अनुभवी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कला प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्वतंत्र लोककला महोत्सव राबविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे सचिव अशोकराव मोहेकर म्हणाले, “संस्थेचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. जिल्हा युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारणे ही मोठी आणि आव्हानात्मक जबाबदारी आहे; मात्र आमच्या महाविद्यालयाने ती समर्थपणे स्वीकारली आहे.”

महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस डॉ. कैलास अंबुरे, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, डॉ. हेमंत भगवान, जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ.संदीप देशमुख, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे आणि सांस्कृतिक समन्वयक दत्ता साकोळे उपस्थित होते.

Previous Post

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

Related Posts

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
भूम तालुक्यात ठाकरे गटाला पुन्हा धक्का; उपजिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडेंसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
Blog

भूम तालुक्यात ठाकरे गटाला पुन्हा धक्का; उपजिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडेंसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

22 August 2026
कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता; अक्की बर्वे यांच्या वास्तुशांतीला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची खास उपस्थिती
Blog

कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता; अक्की बर्वे यांच्या वास्तुशांतीला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची खास उपस्थिती

21 August 2026

Recent Posts

  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
  • मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

491133
Users Today : 48
Users Yesterday : 25
This Month : 523
Total Users : 38498
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group