राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची शिर्डीत उपस्थिती
शिर्डी : माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण व कै. सौ. शालिनी मधुकरराव चव्हाण यांचे नातू तथा श्री. सुनील मधुकरराव चव्हाण व सौ. शुभांगी सुनील चव्हाण (रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे सुपुत्र तथा पंचायत समिती सदस्य चि. रणवीर आणि सौ. सुनिता व श्री. धनंजय भानुदास आठरे-पाटील (रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांची सुकन्या चि. सौ. कां. वेदिका यांचा साखरपुडा रविवारी (दि. ३०) शिर्डी येथे उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडला.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील ‘साई सृष्टी रिसॉर्ट’ येथे दुपारी १२.३० वाजता आयोजित या सोहळ्यास दोन्ही परिवारांतील नातेवाईक, मित्रपरिवारासह राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. उपस्थितांनी रणवीर आणि वेदिका यांना भावी वैवाहिक जीवनासाठी शुभाशीर्वाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या मंगल सोहळ्यास खासदार संदिपान भुमरे पाटील, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार बदामराव पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी आमदार सुधीर तांबे, युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते केशव सावंत तसेच डीसीसी बँकेचे संचालक नानासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व मान्यवरांनी उपस्थित राहून भावी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण, बाबुराव मधुकरराव चव्हाण, अभिजित बाबुराव चव्हाण यांच्यासह चव्हाण व आठरे-पाटील परिवारातील सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या साखरपुडा सोहळ्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.











Users Today : 64
Users Yesterday : 25
This Month : 539
Total Users : 38514