Thursday, July 30, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

Rajkiy Katta by Rajkiy Katta
20 May 2026
in Blog
0
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
0
SHARES
59
VIEWS

धाराशिव : उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच भाजपमध्ये इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र तथा सहकार क्षेत्रातील प्रभावी चेहरा म्हणून ओळख असलेले सुनील मधुकरराव चव्हाण यांनीही उमेदवारीसाठी ताकद लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लातूर–बीड–धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांत भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी ताकद असल्याने ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. नगरपालिकांपासून जिल्हा परिषदांपर्यंत भाजपचे संख्याबळ मजबूत असल्याने उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

मागील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना विजयी करण्यासाठी सुनील चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पक्षातील कार्यकर्ते सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पूर्ण ताकदीने प्रचारात सहभाग घेतला होता.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय भूमिका निभावली. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी सातत्याने संघटनात्मक काम केल्याची चर्चा पक्षात आहे.

अणदूर येथील रहिवासी असलेले सुनील चव्हाण हे सहकार क्षेत्रात सक्रिय राहिले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग येथे त्यांनी संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे सहकार आणि ग्रामीण राजकारणातील त्यांचा संपर्क मजबूत मानला जातो.

धाराशिव जिल्ह्यातून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह आता सुनील चव्हाण यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना जिल्हा परिषद तसेच अनेक नगरपालिकांमध्येही पक्षाचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी अखेर कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवतात, याकडे तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

राजकीय समीकरणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचे गणित आणि संघटनात्मक ताकद यांचा विचार करता भाजपमधील ही लढत आगामी काळात अधिकच रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Next Post

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Related Posts

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
Blog

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

18 May 2026
Next Post
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Posts

  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
  • कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Comments

No comments to show.

Counter

488975
Users Today : 1
Users Yesterday : 85
This Month : 1054
Total Users : 36340
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group