Sunday, September 13, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

Rajkiy Katta by Rajkiy Katta
24 June 2026
in Blog
0
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
0
SHARES
209
VIEWS

धाराशिव, दि. १७ जून २०२६ : जिल्हा परिषद धाराशिवच्या १५ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीचे वाटप सर्व जिल्हा परिषद गटांना समानतेने व स्थानिक गरजांनुसार करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेते विकी संगीता सोमनाथ चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या १० टक्के विकास निधीचे नियोजन करताना काही विशिष्ट जिल्हा परिषद गटांमध्येच शौचालय बांधकाम अथवा इतर मर्यादित कामांसाठी निधी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हा निधी संपूर्ण जिल्ह्यासाठी प्राप्त होत असल्याने त्याचे वाटप नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार सर्व गटांना समसमान व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे.

विकी चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या समस्या व विकासाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी रस्ते, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर काही भागांमध्ये आरोग्य सुविधांची गरज अधिक असते. त्यामुळे केवळ एका प्रकारच्या कामांसाठी निधी खर्च करण्याऐवजी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विकासकामांचे प्रस्ताव मागवून त्या-त्या भागातील गरजांनुसार निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या नसल्याचेही त्यांनी नमूद केले. परिणामी ग्रामीण भागातील अनेक विकासकामे प्रलंबित राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांच्या क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या प्रमाणात समन्यायी वाटप करण्यात यावे. तसेच विकासकामांचे नियोजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशी व स्थानिक गरजांना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून जिल्ह्याचा सर्वांगीण व समतोल विकास साधता येईल, अशी मागणी विकी चव्हाण यांनी केली आहे.

या निवेदनास जिल्हा परिषद सदस्यांसह विविध लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला आहे. निवेदनावर सर्व जिल्हा परिषद सदस्य व सदस्या सीमा माडजे, सविता विकास तळेकर, अश्विनी सुनील उंदरे, विजयमाला मार्कड, जयश्री बालाजी काळे,साधना बापूसाहेब अंधारे,वैशाली चंद्रकांत डोके,अमर सुभाषराव मोरे,अजित भागवत लाकाळ आणि सुवर्णा सतीश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491247
Users Today : 7
Users Yesterday : 89
This Month : 637
Total Users : 38612
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group