भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर करत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मतभेद असू शकतात; मात्र ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. अशा कृतीमुळे संघटनेची प्रतिमा आणि पक्षाचा सन्मान बाधित होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पुढे नमूद केले की, संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शिस्तबद्ध कार्यपद्धतीतूनच सक्षम संघटना आणि प्रभावी नेतृत्व घडते. त्यामुळे अंतर्गत विषय संघटनेतच मांडून संवादाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढावा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या या सोशल मीडिया पोस्टची भाजप कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू असून, संघटनात्मक शिस्तीबाबत दिलेला त्यांचा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे.












Users Today : 35
Users Yesterday : 34
This Month : 1122
Total Users : 36408