Saturday, September 12, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Rajkiy Katta by Rajkiy Katta
18 June 2026
in Blog
0
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
0
SHARES
635
VIEWS

धाराशिव : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील, विशेषतः कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मतदारसंघात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रितपणे पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही कोणत्याही दादाकडे जाणे सहज शक्य होते. मात्र, दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या वेगळे मार्ग स्वीकारण्याची शक्यता निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांना वैयक्तिकरित्या मानणारा एक मोठा वर्ग आहे. लोकसभेचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी मतदारसंघात निर्माण केलेला संपर्क आणि जनाधार आजही कायम आहे. दुसरीकडे, आमदार कैलास पाटील यांनी गेल्या सहा वर्षांत विधानसभा मतदारसंघात विकासकामे आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी घट्ट नाते निर्माण केले आहे.

यामुळे “कोणत्या दादांचा झेंडा हाती घ्यायचा?” हा प्रश्न अनेक शिवसैनिकांना सतावत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये परिस्थिती तुलनेने स्पष्ट असली, तरी कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघात मात्र कार्यकर्त्यांसाठी निर्णय घेणे अधिक कठीण ठरणार आहे.

सध्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत जोरदार चर्चा सुरू असली, तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत घडणाऱ्या राजकीय घडामोडींवरच संपूर्ण चित्र अवलंबून राहणार आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांमध्ये मात्र एकच चर्चा रंगली आहे—जर दोन दादांच्या वाटा वेगळ्या झाल्या, तर आपण कोणता झेंडा हाती घ्यायचा?

Previous Post

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

Next Post

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491196
Users Today : 45
Users Yesterday : 66
This Month : 586
Total Users : 38561
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group