Sunday, September 13, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

Rajkiy Katta by Rajkiy Katta
15 May 2026
in Blog
0
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
0
SHARES
784
VIEWS


“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार विकासकामांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्याचे काम माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे चित्र तेरखेडा जिल्हा परिषद गटात पाहायला मिळत आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून, तेरखेडा जिल्हा परिषद गटातही विकासाची गंगा पोहोचत आहे. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचे शेतरस्ते मोठ्या प्रमाणात करण्यात येतील, असा शब्द आमदार तानाजीराव सावंत यांनी दिला होता. आता तो शब्द प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहे.


मतांसाठी नव्हे तर समाजकारणाच्या भूमिकेतून निवडणुकीपूर्वीही अनेक शेतरस्त्यांची कामे करण्यात आली होती. आता शासनाच्या माध्यमातून विविध रस्त्यांच्या कामांना अधिक गती देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर १५ मे रोजी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण आणि बालाजी आण्णा घोलप यांनी पुढाकार घेत विविध रस्त्यांची पाहणी केली.
यामध्ये नॅशनल हायवे ५२ तेरखेडा ते वडजी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते हेडसरी रस्ता, सटवाईवाडी रस्ता ते बसवेश्वर मंदिर शिवार रस्ता, माणिकदंड रस्ता ते सटवाईवाडी रस्ता तसेच खामकरवाडी ते उंबरगा रस्त्याची पाहणी करण्यात आली. याशिवाय गोळे शिवार, उकरंडे शिवार, घोलप शिवार आणि हलकरे शिवारातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचीही पाहणी करून संबंधित कामांना लवकर गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदार प्रकाश मेहत्रे, बालाजी हलकरे, कृष्णा माळी, रामलिंग शिंदे, स्वप्निल पोळ, समाधान घोलप, रोहित घोलप यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

“आमदार तानाजीराव सावंत यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण करण्याचे काम सुरू केले आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते, दळणवळण आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांना गती दिली जात आहे. तेरखेडा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक शिवारापर्यंत चांगले रस्ते पोहोचावेत, हा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन पुढील काळातही विकासकामे अधिक वेगाने करण्यात येतील.”
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या प्रश्नांना प्राधान्य देत सुरू असलेल्या या कामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संदेश उर्फ विकी चव्हाण

जिल्हा परिषद सदस्य तेरखेडा गट तथा गटनेते शिवसेना धाराशिव जिल्हा परिषद

Previous Post

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491247
Users Today : 7
Users Yesterday : 89
This Month : 637
Total Users : 38612
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group