Thursday, July 30, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Rajkiy Katta by Rajkiy Katta
22 April 2026
in Blog
0
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
0
SHARES
185
VIEWS


धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष राहिलेले दत्ताभाऊ कुलकर्णी यांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
मध्यंतरी राज्यसभेसाठी २४ नावांची यादी केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात आली होती. त्या यादीमध्ये दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे नाव समाविष्ट असल्याची चर्चा होती मात्र त्यावेळी त्यांना ती संधी न मिळाल्याने त्यांना त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी २०१७ ते २०२० आणि 2024 पासून आजपर्यंत धाराशिव जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. आठही नगरपालिकांमध्ये भाजपला सत्ता मिळाली असून धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्ग येथे नगराध्यक्षपद, तर भूम, परंडा आणि कळंब येथे उपनगराध्यक्षपदे भाजपकडे गेली आहेत.

याशिवाय, प्रथमच जिल्हा परिषदेतही भाजपची सत्ता प्रस्थापित झाली असून अनेक पंचायत समित्यांमध्येही पक्ष सत्तेवर आला आहे. या यशामध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्व आणि सर्व पक्षांशी असलेले सुसंवाद हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य मानले जाते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षाचे काम जोमाने केले असून धाराशिव जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष करण्यासाठी यांच्या सोबत विश्वासू सहकारी म्हणून काम करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला होता, ही बाबही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती.
दरम्यान, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सध्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाची गती वाढत असल्याचे मानले जाते. मात्र, दत्ताभाऊ कुलकर्णी यांना विधानपरिषदेवर संधी मिळाल्यास या विकासाला आणखी वेग मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी सध्या भाजप कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे.

Previous Post

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

Next Post

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

Related Posts

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
Next Post
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

Recent Posts

  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
  • कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Comments

No comments to show.

Counter

488974
Users Today : 85
Users Yesterday : 54
This Month : 1053
Total Users : 36339
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group