Friday, September 11, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

Rajkiy Katta by Rajkiy Katta
21 August 2026
in राजकीय
0
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
0
SHARES
568
VIEWS

कळंबमध्ये पक्षांतरावर ‘बॅनरवॉर’; नगरसेवकांवर मतदारांच्या विश्वासघाताचा आरोप

कळंब (प्रतिनिधी) : कळंब नगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापू लागले आहे. पक्षप्रवेशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले असून, पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर थेट “मतदारांच्या विश्वासघाताचा” आरोप करण्यात आला आहे.

शहरातील प्रमुख मार्गावर लावण्यात आलेल्या या बॅनरवर “सावधान! गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान!!” तसेच “मतदारांच्या विश्वासघाताचा जाहीर निषेध!” असा मजकूर ठळक अक्षरांत झळकत आहे. त्यामुळे कळंबमधील राजकीय लढाई आता पक्ष कार्यालये आणि सभांपुरती मर्यादित न राहता थेट रस्त्यावरील बॅनरपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.

कळंब नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसशी संबंधित एकूण दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये संबंधित नगरसेवकांच्या निर्णयावर तीव्र टीका करण्यात आली आहे.

“जनतेने विरोधक म्हणून निवडून दिलेल्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला,” असा दावा बॅनरमधून करण्यात आला असून, विकासाचे कारण पुढे करून पक्षांतर करणे म्हणजे मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अनादर असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”

बॅनरवरील सर्वाधिक लक्षवेधी ओळ म्हणजे —
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”

याच ओळीमुळे शहरातील राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. निवडणुकीत एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात जाणे कितपत योग्य, यावर आता शहरातील राजकीय कट्ट्यांपासून सोशल मीडियापर्यंत चर्चा सुरू झाली आहे.

बॅनरमध्ये “हा केवळ पक्षबदल नाही, हा मतदारांच्या विश्वासाचा आणि जनादेशाचा अपमान आहे,” अशी भूमिका मांडत पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचा निषेध करण्यात आला आहे.

जनतेसमोर दोन सवाल

या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने दोन थेट प्रश्न उपस्थित केले आहेत —
“मतदारांच्या विश्वासघाताला जबाबदार कोण?” आणि “जनादेशाची किंमत इतकी स्वस्त आहे का?”

त्यामुळे कळंबच्या राजकारणात आता पक्षांतराचा विषय केवळ कोणत्या पक्षाची संख्या किती वाढली किंवा कमी झाली एवढ्यापुरता राहिलेला नसून, मतदारांचा कौल आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची राजकीय भूमिका या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे.

पक्षप्रवेशानंतर आता ‘पोस्टर पॉलिटिक्स’

भाजपने नगरसेवकांना पक्षात घेत आपली ताकद वाढवल्यानंतर ठाकरे गटानेही या प्रवेशावर रस्त्यावर उतरून राजकीय प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केल्याचे या बॅनरवरून दिसत आहे.

“कळंबकरांनो, लोकशाहीचा अपमान करणारे पक्षांतर ओळखा” असे आवाहनही बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

एकीकडे भाजपकडून या प्रवेशाकडे विकास आणि राजकीय विस्ताराच्या दृष्टीने पाहिले जात असताना, दुसरीकडे ठाकरे गट मात्र त्याला मतदारांच्या जनादेशाशी केलेली प्रतारणा म्हणून मांडत आहे. अर्थात पक्षांतर करणाऱ्या संबंधित नगरसेवकांची या आरोपांबाबत स्वतंत्र भूमिका समोर आल्यानंतरच चित्र अधिक स्पष्ट होईल.

मात्र सध्या तरी कळंबच्या राजकारणात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे — नगरसेवकांचे पक्षांतर संपले असले, तरी त्यावरची राजकीय लढाई संपलेली नाही. उलट ‘ऑपरेशन कमळ’नंतर आता शहरात ‘बॅनरवॉर’चा नवा अध्याय सुरू झाला आहे!

Previous Post

कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता; अक्की बर्वे यांच्या वास्तुशांतीला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची खास उपस्थिती

Next Post

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
Next Post
हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

Recent Posts

  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
  • मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

491149
Users Today : 64
Users Yesterday : 25
This Month : 539
Total Users : 38514
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group