Friday, July 31, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Rajkiy Katta by Rajkiy Katta
18 March 2026
in Blog
0
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
0
SHARES
669
VIEWS


2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सावंत कुटुंबीयांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत काहीसे अलिप्त दिसत असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले होते. कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते; मात्र कुटुंबातील मतभेद मिटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.


दरम्यान, आज मुंबई येथे जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते, तसेच आ.राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवक नेते मल्हार पाटील, नगरसेवक व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, ज्येष्ठ नेते अनिल काळे यांच्या उपस्थितीत पार पडला.


यावेळी माजी अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय मोहिते, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गौतम लटके,परंडा तालुका संघटक जयदेव गोफणे, युवा सेनेचे भूम तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण तसेच जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंत, मुलगी सखी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आणि त्यांना अधिक ताकद देण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत.” तसेच त्यांनी डॉ. तानाजी सावंत हे मोठे नेते असल्याचा उल्लेखही केला.


अधिकृत प्रवेशाबाबत संभ्रम

विशेष म्हणजे, आजच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले नाही. त्यांच्या कुटुंबीयांचा आणि समर्थकांचा प्रवेश झाला असला तरी त्यांच्या बाबतीत तांत्रिक कारणे पुढे येत असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत हे अपक्ष म्हणून निवडून आल्यामुळे काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अपक्ष सदस्यांना इतर पक्षात प्रवेश करताना सहसा अडचण येत नाही, त्यामुळे हा प्रवेश अधिकृतपणे का झाला नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.


राजकीय चर्चांना उधाण
जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या प्रवेशामुळे भाजपला एक सक्षम नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र पक्ष प्रवेशावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांची अनुपस्थिती या पक्षप्रवेशांमध्ये दिसून आली.

जवळा जिल्हा परिषद गटात धनंजय सावंत यांनी दाखवून दिली होती ताकद

जवळा नि.जिल्हा परिषद गटातून धनंजय सावंत यांनी जवळपास 2300 पेक्षा जास्त मताच्या फरकाने विजय मिळवला होता त्यामुळे या गटांमध्ये त्यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली आणि त्या ताकतीच्या बळावरच भारतीय जनता पार्टीने देखील त्यांच्यासाठी ग्रीन कार्पेट अंथरल्याची माहिती आहे. तसेच गेल्या अनेक दिवसापासून भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीला फारसं यश मिळवता आलेलं नाही. त्यामुळे हा पक्ष प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यासोबतच अनेक जुने नेतेही त्यांच्या समवेत असल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये धक्का बसल्याची चर्चा आहे. माजी मंत्री व भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांचे धनंजय सावंत हे सख्खे पुतणे आहेत व अनेक वर्ष डॉ.तानाजी सावंत यांचा ते मतदार संघातील कारभार पाहत होते त्यामुळे या पक्षप्रवेशांकडे एक महत्त्वाचा पक्ष प्रवेश म्हणून पाहिले जात आहे.

जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत जिल्हा परिषद अध्यक्ष पद निवडीच्या वेळी घेतली होती ठाम भूमिका

धाराशिव जिल्हा परिषदेला कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हते अशावेळी भारतीय जनता पार्टी अध्यक्षपदावर अर्चनाताई पाटील यांना विराजमान करण्यासाठी चंग बांधला होता.त्याच वेळी माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत व इतरांनी अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदाकरिता विरोध केल्यामुळे त्याचवेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी ठाम भूमिका घेत भाजपला पाठिंबा दिला होता.

धनंजय सावंत यांना जिल्हा परिषद सभापती पद मिळणार?

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर आणि सभापती निवडीच्या अगोदर प्रवेश झाल्यामुळे धनंजय सावंत यांना सभापती पद मिळणार का? अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रक्ष प्रवेश करा त्यानंतर आपण सभापती पदाचे बघू असं काही झालं आहे का? या गोष्टी देखील सभापती पदाच्या निवडीनंतर लक्षात येतील.

Previous Post

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

Next Post

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

Related Posts

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
Next Post
भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

Recent Posts

  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
  • कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Comments

No comments to show.

Counter

489020
Users Today : 12
Users Yesterday : 34
This Month : 1099
Total Users : 36385
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group