Friday, July 31, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

Rajkiy Katta by Rajkiy Katta
15 March 2026
in Blog
0
तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत
0
SHARES
84
VIEWS

शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता घडविणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. या परंपरेला अनुसरून माजी आरोग्यमंत्री तथा वाशी-भूम-परांडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनीही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना नेतृत्वाच्या स्थानापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.


शिवसेनेची स्थापना झाल्यापासूनच हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातो. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही अनेक सामान्य कार्यकर्त्यांना आमदार-मंत्री होण्याची संधी मिळाली. त्याच परंपरेतून आज महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवासही सर्वसामान्य रिक्षाचालकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेला आहे. हा प्रवास म्हणजे पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेल्या बळाचे उत्तम उदाहरण आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हीच शिकवण मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना देतात. त्याच धर्तीवर आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे धाराशिव जिल्ह्यात छोट्यात छोट्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांना संधी देण्याची परंपरा जपताना दिसतात. एखादा कार्यकर्ता राजकारणात किती मोठा किंवा अनुभवी आहे यापेक्षा तो सर्वसामान्यांच्या कामासाठी निस्वार्थपणे धावतो का, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतो का, गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी झटतो का—याला ते अधिक महत्त्व देतात.


अशाच पद्धतीने कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मला संधी मिळाली, असे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ विकी चव्हाण यांनी सांगितले. “मी साधी ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा लढवलेली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेरखेडा जिल्हा परिषद गटातून मला उमेदवारी देण्यात आली आणि मी निवडूनही आलो. पुढे धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेत बसताना मला शिवसेना गटनेतेपदाची जबाबदारीही देण्यात आली. त्यामुळे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आज जिल्ह्याच्या राजकारणात माझी ओळख निर्माण झाली आहे,” असे त्यांनी सांगितले.

“शिवसेना पक्ष, मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कायम सार्थ ठरवेन. गरजवंत व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राजकीय कट्टाशी बोलत होते.पक्षाच्या ध्येय-धोरणांशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञाही जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते विकी उर्फ संदेश चव्हाण यांनी केली. “कार्यसम्राट आणि शिवजल क्रांतीचे प्रणेते असलेल्या आमदार सावंत यांसारख्या नेत्याने कार्यकर्त्यांना घडविण्याची जी धमक दाखवली आहे, अशा नेत्यांना आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील आयुष्य लाभो आणि येणाऱ्या काही काळातच डॉ.तानाजीराव सावंत साहेब हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात दिसो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी बोलताना दिल्या….

Previous Post

धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू: प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

Next Post

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
Next Post
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Posts

  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
  • कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Comments

No comments to show.

Counter

489022
Users Today : 14
Users Yesterday : 34
This Month : 1101
Total Users : 36387
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group