Tuesday, May 26, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

अवैध धंदे बंद करा” म्हणणारे काँग्रेस नेतेच मटका बुकी म्हणून उघड – तुळजापूरमध्ये खळबळ

Rajkiy Katta by Rajkiy Katta
19 May 2025
in राजकीय
0
अवैध धंदे बंद करा” म्हणणारे काँग्रेस नेतेच मटका बुकी म्हणून उघड – तुळजापूरमध्ये खळबळ
0
SHARES
99
VIEWS

शहरातील अवैध धंद्यांविरोधात आंदोलने करून पोलिसांना निवेदने देणारे काँग्रेसचे पदाधिकारी अमोल माधवराव कुतवळ यांच्यावरच मटका व्यवसाय चालविल्याचा गुन्हा दाखल झाल्याने तुळजापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चार महिन्यांपूर्वी शहरात अवैध धंद्यांबाबत सातत्याने आवाज उठवणारे, पत्रकार परिषद घेत आरोप करणारे आणि निवेदने देणारे कुतवळ यांचे नावच पोलिसांनी शनिवारी रात्री झालेल्या कारवाईत मटका बुकी म्हणून उघड केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

तामलवाडी येथे ड्रग्ज प्रकरणानंतर कुतवळ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन विविध आंदोलनं केली होती. “शहरातील अवैध धंद्यांना कोणाचा आशीर्वाद आहे?” या प्रश्नांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी वारंवार केली होती.

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाविरोधात निवेदने देत शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी जोरदार केली जात होती. निवेदनांनंतर फोटोसेशन करून प्रसारमाध्यमांत बातम्या प्रसिद्धही करण्यात आल्या.

मात्र, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः पुढाकार घेत खास पथकाद्वारे शनिवारी रात्री हॉटेल राज पॅलेस येथे छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात मटका व्यवसाय सुरू असल्याचे आढळले व त्यामध्ये काँग्रेस नेते अमोल कुतवळ यांच्यासह भाजपचे विनोद गंगणे आणि सचिन पाटील यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी एकूण ३३ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तक्रार करणारेच अवैध धंद्यात गुंतल्याचे उघड झाल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आंदोलनांच्या आडून स्वतःचे धंदे चालवत होते का?” असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

या प्रकरणामुळे काँग्रेस पक्षाचीही प्रतिमा धुळीस मिळण्याची शक्यता असून, पुढील तपासात आणखी कोणती नावे पुढे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची नियुक्ती

Next Post

भारतीय जनता पार्टीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभात राजकीय चमत्कार

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
भारतीय जनता पार्टीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभात राजकीय चमत्कार

भारतीय जनता पार्टीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभात राजकीय चमत्कार

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486522
Users Today : 20
Users Yesterday : 24
This Month : 1043
Total Users : 33887
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group