Friday, July 31, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मल्हार पाटील यांची तयारी सुरू?

Rajkiy Katta by Rajkiy Katta
18 April 2026
in Blog
0
2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मल्हार पाटील यांची तयारी सुरू?
0
SHARES
42
VIEWS

धाराशिव | राजकीय कट्टा वृत्तसेवा
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच पूर्ण झाला असून सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदांच्या नियुक्त्याही पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुढील 2029 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीच्या दृष्टीने मल्हार पाटील हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यक्रम आयोजित केले असून त्यातून त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील इच्छुकतेचे संकेत मिळत आहेत.
याशिवाय, त्यांनी अलीकडेच बार्शी तालुक्यातील पानगाव येथे दौरा केल्यामुळे ते धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा रंगली आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर मल्हार पाटील यांच्यासोबत त्यांच्या सहचारिणींचाही फोटो झळकत असल्याने, भविष्यात महिला आरक्षण लागू झाल्यास त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची रणनीती देखील असू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पक्षांतर्गत स्थान अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे त्यांचे पुढील लक्ष्यही लोकसभा निवडणूक असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मात्र, या निवडणुकीस अजून सुमारे तीन वर्षांचा कालावधी असल्याने या काळात अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात. राज्य आणि केंद्रातील राजकारण, आघाड्यांची स्थिती, तसेच इतर रणनीती यांचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार आहे.
सध्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा संपर्क नगरपालिका निवडणुकीनंतर काहीसा कमी झाल्याची चर्चा असून त्यांच्या पुढील भूमिकेबाबतही उत्सुकता आहे. काही कार्यकर्ते बदलाची गरज व्यक्त करताना दिसत आहेत.
एकूणच, पुढील काही वर्षांत धाराशिवच्या राजकारणात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता असून 2029 ची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार, हे स्पष्ट दिसत आहे.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदी सिध्देश्वर कोरे, विश्वास कोकणे, भाऊसाहेब खरसडे पूजा शिंदे व विश्वास कोकणे यांना संधी?

Next Post

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदासाठी स्वीकृत सदस्याचा जी.आर.निर्गमित, कोण होणार स्वीकृत सदस्य

Related Posts

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026
उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
Next Post
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदासाठी स्वीकृत सदस्याचा जी.आर.निर्गमित, कोण होणार स्वीकृत सदस्य

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदासाठी स्वीकृत सदस्याचा जी.आर.निर्गमित, कोण होणार स्वीकृत सदस्य

Recent Posts

  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
  • १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी
  • कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

Recent Comments

No comments to show.

Counter

489016
Users Today : 8
Users Yesterday : 34
This Month : 1095
Total Users : 36381
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group