Friday, May 29, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

Rajkiy Katta by Rajkiy Katta
23 January 2026
in राजकीय
0
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

oplus_1048578

0
SHARES
174
VIEWS

भूम (धाराशिव)
भूम तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, काही गटांत एकाच पक्षाचे दोन-दोन उमेदवार रिंगणात असल्याने मुख्य उमेदवार कोण आणि डमी उमेदवार कोण, हे २७ तारखेपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच निवडणूक लढतीचे खरे चित्र समोर येणार आहे.

भूम तालुक्यातील पाथरूड जिल्हा परिषद गटात सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत होणार असल्याचे चित्र आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता उर्फ अमोल भोरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शंकर नागरगोजे, भाजपकडून सिताराम वनवे तर शिवसेनेकडून रामकिसन गव्हाणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासह तब्बल ११ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या गटात चुरशीची लढत अपेक्षित आहे.

ईट(महिला राखीव) जिल्हा परिषद गटात भाजपकडून वर्षा ज्ञानेश्वर गीते व प्रियंका विकास जालन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून अंजनाबाई आनंदराव देशमुख व स्नेहल सुनील भोईटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सगुना अशोक सोन्ने,राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभांगी सुनील देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. या गटातून एकूण १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

सुकटा जिल्हा परिषद गटातून एकूण १३ उमेदवार रिंगणात असून शिवसेनेकडून साखरबाई मधुकर अर्जुन व विजयमाला भाऊसाहेब मारकड,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लक्ष्मी बबन जानकर व बांगर सविता भगवान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा सूर्यकांत कांबळे व सुप्रिया संजय पाटील, भाजपकडून धनश्री रणजित हापटे, काँग्रेसकडून पूजा प्रभाकर डोंबाळे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्वेता सुधाकर हाके तसेच चार अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

वालवड जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा सूर्यकांत कांबळे व पल्लवी प्रवीण खटाळ, शिवसेनेकडून जयश्री बालाजी काळे व अर्चना अंकुश दराडे, भाजपकडून लता शांतीलाल गोरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उर्मिला अशोक वनवे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून स्वाती गजानन सोलंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या गटातून एकूण १४ उमेदवार, त्यात ७ अपक्षांचा समावेश आहे.

आष्टा (खुला) जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून साधना बापूसाहेब अंधारे व विशाल अंधारे, भाजपकडून मारुती रामलिंग चोबे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महादेव खैरे व नितीन जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाकडून किशोर भागवत डोंबाळे, राष्ट्रीय समाज दलाकडून रविंद्र लोमटे, शिवसेनेकडून सय्यद झीनत कोहिनूर तसेच सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

आष्टा व वालवड गटातून प्रत्येकी १४, पाथरूड गटातून १५, तर सुकटा व ईट गटातून प्रत्येकी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, भूम तालुक्यातील पाचही गटांसाठी एकूण ७० उमेदवार इच्छुक असल्याचे चित्र आहे. उमेदवारी माघारीनंतर २७ तारखेला अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर भूम तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक खऱ्या अर्थाने रंगणार आहे.

Previous Post

नोकरीवर पाणी सोडून सात वर्षे पक्षासाठी झटलेल्या प्रा. तुषार वाघमारे यांना न्याय; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
राजकीय

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

31 October 2025
Next Post
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486604
Users Today : 21
Users Yesterday : 20
This Month : 1125
Total Users : 33969
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group