Sunday, September 13, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

नोकरीवर पाणी सोडून सात वर्षे पक्षासाठी झटलेल्या प्रा. तुषार वाघमारे यांना न्याय; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

Rajkiy Katta by Rajkiy Katta
11 January 2026
in Blog
0
नोकरीवर पाणी सोडून सात वर्षे पक्षासाठी झटलेल्या प्रा. तुषार वाघमारे यांना न्याय; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
0
SHARES
422
VIEWS

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्ह्याच्या वतीने कळंब तालुक्यासाठी नवीन तालुकाध्यक्ष म्हणून प्रा. तुषार बिभीषण वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही संधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी दिली असून, प्रामाणिक, निष्ठावंत आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिल्याची भावना पक्षात व्यक्त होत आहे.

प्रा. तुषार वाघमारे यांनी स्वतःच्या नोकरीवर पाणी सोडून गेल्या सात वर्षांपासून पक्षीय कामात स्वतःला पूर्णतः झोकून दिले आहे. पक्षसंघटन, जनतेचे प्रश्न, आंदोलन, बैठकांमध्ये सक्रिय सहभाग आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सातत्याने जनतेपर्यंत पोहोचवली आहे.
त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी त्यांच्यावर कळंब तालुकाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. प्रा.वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कळंब तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, युवकांमध्ये पक्षाची ताकद वाढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरणे अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रा. तुषार वाघमारे सातत्याने प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल प्रा. तुषार वाघमारे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

नियुक्तीवेळी पूर्व अध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, आत्माराम बिक्कड,भीमा हागारे,महेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

Next Post

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491246
Users Today : 6
Users Yesterday : 89
This Month : 636
Total Users : 38611
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group