Monday, September 14, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

कात्रज पुणे येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून देण्याचा निर्धार

Rajkiy Katta by Rajkiy Katta
13 October 2024
in राजकीय
0
कात्रज पुणे येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत  यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा  निवडून देण्याचा निर्धार
0
SHARES
182
VIEWS

रविवार, १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यातील माऊली गार्डन मंगल कार्यालय, कात्रज येथे भूम, परांडा, वाशी येथील बांधवांचा “कौटुंबिक स्नेह मेळावा” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव,कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. गिरीराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्यात गिरीराज सावंत यांनी मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधत भूम परांडा वाशी मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी सावंत साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

आजवर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सावंत यांनी हजारो कोटींचा विकास निधी आणला आहे.विकासाचा अजोड प्रवास आजही अविरत सुरू आहे. आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सावंत साहेब अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे आता आपण ठरवलं पाहिजे की, ही विकासाची गंगा अशीच सतत वाहती ठेवायची असेल, तर साहेबांना पुन्हा विधानसभेत पाठवायला हवं…विकासाला साथ देण्याचं आवाहन यावेळी गिरीराज सावंत यांनी उपस्थितांना केलं.

आता ही निवडणूक फक्त एक राजकीय लढाई नाही, ही आपल्या विकासाची लढाई आहे. सावंत साहेबांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत…अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, त्या सर्वांची पोचपावती आपल्याला डॉ.तानाजी सावंत द्यायची असेल तर साहेबांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवून, मतदान रुपी आशीर्वाद द्यावा लागेल…

आपण सर्वांनी एकत्र येऊन तानाजीराव सावंत साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासाला अधिक बळ द्यायचं आहे.

कार्यक्रमात दक्षिण पुणे, कात्रज परिसरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “भूम परांडा वाशी भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत व मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासकामांचे कौतुक करत, त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक चंद्रकांत सरडे,उद्योजक राजाभाऊ शेळके, उद्योजक रामभाऊ पवार व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी दशरथ पाटील साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन), किरण काकासाहेब घोरतळे (पत्रकार), श्री.आकाश फासगे, भाऊसाहेब कोकाटे (प्रसिद्ध निवेदक), मोहनराव तिपाले (उद्योजक), नाना पिंगळे, नदीम भाई मुजावर, एव्हरेस्ट देशमुख (युवा उद्योजक), डॉ. सुचेता भालेराव (भैरवी सोशल फाउंडेशन), श्री.रमेश गणगे, भागवत तनपुरे (कामगार नेते), अमित गायकवाड (प्रसिद्ध वकील), शहाजी गोरे (युवा उद्योजक), तात्या सरोदे (शासकीय अधिकारी), गणेश कुलकर्णी, अशोक शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी, संतोष गाजरे, मारुती शिंदे (वरद एंटरप्रायझेस), डॉ.गरड, राविभाऊ बोरुडे, अतुल भराटे (Alpha Classes चा संस्थापक), तानाजी कुदळे (Swiftcon Lift’s Pvt Ltd), दत्ता भांडवलकर (युवा उद्योजक), दिलीप काळे, सुरेश काळे, सचिन शेळगावकर, जयराम रगडे, भागवत वेताळ (युवा उद्योजक) व भूम परांडा वाशी येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर होती- भाजपचे नितीन काळे यांचा गौप्यस्फोट

Next Post

कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातून केशव सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
राजकीय

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

21 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
Next Post

कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातून केशव सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491319
Users Today : 18
Users Yesterday : 61
This Month : 709
Total Users : 38684
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group