देवानंद रोचकरी यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या अर्चनाताई पाटील यांना दिलासा
धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्री.देवानंद रोचकरी यांनी जाहीर पाठिंबा दिला…
श्री.देवानंद रोचकरी यांनी सोनारी भैरवनाथ साखर कारखाना स्थळी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपास्थितीत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना जाहीर पाठींबा दर्शवित तुळजापूर तालुक्यातून मोठ्या मताधिक्क्याने निवडूण देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252