Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा-ॲड.धनंजय धाबेकर

Rajkiy Katta by Rajkiy Katta
4 May 2024
in राजकीय
0
कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा-ॲड.धनंजय धाबेकर
0
SHARES
21
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा –

धाराशिव लोकसभेचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. धाराशिवच्या विकासासाठी निधी द्यायचं सोडा; हा अनेकांच्या लग्नात जातो, जेवण करतो, फोटो काढतो, पण एक रुपयाचा आहेर देखील कधी कुणाला केलेला दिसला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते ॲड.धनंजय धाबेकर यांनी विद्यमान खासदार ओमराजे निबांळकर यांच्यावर टीका केली.

धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुटीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ॲड.धनंजय धाबेकर बोलत होते.

ॲड.धनंजय धाबेकर म्हणाले, इतर लग्नांच सोडा पण बाप मेल्यानंतर वर्षभरात कराव्या लागणाऱ्या कित्तेक लग्नात याने हजेरी लावली. पण कधी त्यांना मदत म्हणून एक रुपयांचा देखील आहेर केला नाही. तो काय आपल्यासाठी निधी आणणार. गेल्या 20 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. आम्हीच त्यांचा प्रचार केला. मात्र सांगण्यासारखे एकही काम त्यांनी केलेलं नाही. नेहमी दुसऱ्यांना बदनाम करण्याचे राजकारण त्यांनी केले आहे. केवळ कर्मकारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचं हा त्यांचा धंदा आहे. त्याच कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट म्हणून ते उल्लेख करतात. सर्व नोकरदारांनी अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या या वागणुकीचा मतदान करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर म्हणाले होते, कारखाना भंगार होता तर तुम्ही विकत का घेतला? पण आता जेव्हा त्या कारखान्या बाहेर ऊसाचे ट्रक लागताना त्यांना दिसत असतील,  तेव्हा डॉ. तानाजी सावंतांनी हा कारखाना का घेतला? हे कळत असेल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या भागातील उसाला भाव मिळाला पाहिजे. या भागातील कामगारांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे, या भावनेतून सावंत यांनी हा कारखाना घेतला असल्याचे धाबेकर म्हणाले.

Previous Post

चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

Next Post

संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही-धनंजय मुंडे

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही-धनंजय मुंडे

संविधानास सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणीही बदलणार नाही-धनंजय मुंडे

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483433
Users Today : 4
Users Yesterday : 139
This Month : 1113
Total Users : 30798
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group