Monday, September 14, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर अर्चना ताईंना निवडून द्या-देवेंद्र फडणवीस

Rajkiy Katta by Rajkiy Katta
28 April 2024
in राजकीय
0
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर अर्चना ताईंना निवडून द्या-देवेंद्र फडणवीस
0
SHARES
20
VIEWS

बार्शी राजकीय कट्टा वृत्तसेवा –

कोरोना काळात भारतात मृतांची संख्या दोन ते तीन कोटींच्या आसपास असेल असा अंदाज होता. कारण जेव्हा जेव्हा महामारी आली तेव्हा तेव्हा भारतात त्याची लस येई पर्यंत 30, 40 वर्ष लागली असती मात्र मोदींनी कोरोनाच्या काळात भारतातील संशोधकांना एकत्र केलं आणि भारतीय बनावटीची लस तयार केली. इतकेच नव्हे तर भारतीयांना दोनदा ती लस मोफत देखील  दिली. आज आपण सगळे जिवंत आहोत ते मोदीजींच्या लसीमुळे. ती लस नसती तर आपल्या देशाची काय अवस्था झाली असती याची कल्पना करा, त्या प्रत्येक लसीसाठी आपण मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे; असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केले.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत बार्शी येथे ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत,आमदार राणाजगजितसिंह, आमदार राजेंद्र राऊत, अर्चना पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ही निवडणूक स्थानिक पातळीची नाहीये देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे, देशाला कोण सुरक्षित करू शकेल, पुढील दहा वर्षाच्या भवितव्य कोण घडवू शकतील याचा विचार करून मतदान करा. आज नरेंद्र मोदी यांच्या समवेत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, रामदास आठवले यांची रिपाइ, रयत क्रांती, जनसुराज्य आदी पक्षांची व्यापक मोठी युती आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत.  भाजप सोबतची महायुती ही विकासाची गाडी आहे.  ज्याला नरेंद्र मोदी नावाचे मोठे इंजिन लागले आहे. मोदीजींच्या विकासाच्या रेल्वेला अनेक डबे आहेत ज्यामध्ये ओबीसी, अल्पसंख्यांक, तरुण, महिला यांसाठी जागा आहेत तर राहुल गांधी यांच्या गाडीला इंजिनच नाहीये प्रत्येक पक्ष म्हणतात की मीच इंजिन आहे त्यामुळे जर आपल्याला विकास पाहिजे असेल तर अर्चनाताई यांना मोठ्या मताने विजयी करा, म्हणजे बार्शी सहित धारशिवची बोगी मोदींच्या रेल्वे इंजिनला जाऊन लागते आणि ही रेल्वे विकासाकडे निघेल.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या  योजनेसाठी आम्ही 24,000 करोड रुपये ठेवले आहेत आचारसंहिता उठल्यानंतर आम्ही ते देणार आहोत.  शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये हे  पैसे जमा होणार आहेत. अवकाळी पावसामुळे सोयाबीन खूप मोठ्या नुकसान झाला आहे. त्यांना देखील नुकसानभरपाई दिली जाईल. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असा शब्द देखील फडणवीस यांनी यावेळी दिला

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाराशिव दौऱ्यांनी राजकीय वातावरण निघणार ढवळून

Next Post

ओमराजेंच्या ‘तू किस झाड की पत्ती’ या वक्तव्याचा मल्हार पाटील यांच्याकडून खरपूस समाचार

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
राजकीय

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

21 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
Next Post
ओमराजेंच्या ‘तू किस झाड की पत्ती’ या वक्तव्याचा मल्हार पाटील यांच्याकडून खरपूस समाचार

ओमराजेंच्या 'तू किस झाड की पत्ती' या वक्तव्याचा मल्हार पाटील यांच्याकडून खरपूस समाचार

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491308
Users Today : 7
Users Yesterday : 61
This Month : 698
Total Users : 38673
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group