Monday, September 14, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आधी सास-याला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या-अजित पवार

Rajkiy Katta by Rajkiy Katta
19 April 2024
in राजकीय
0
आधी सास-याला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या-अजित पवार
0
SHARES
3
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो. पण विकास पुरूष नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आहोत. राज्याचा विकास करायचा असेल तर केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असले पाहिजे. यापूर्वी तुम्ही अर्चना पाटील यांचे सासरे यांना निवडून दिले होते. आता सुनेची वेळ आली आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. तसेच ‘सून ही घरातली असते, काही लोक तिला बाहेरची समजतात’, अशा शब्दात शरद पवार यांच्यावर टीका देखील केली.

धाराशिव लोकसभा निवडणुकीतील धाराशिव मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार  अर्चना  पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत,आ.राणाजगजितसिंग पाटील,आ.राजेंद्र राऊत,आ.अभिमन्यू पवार,माजी मंत्री बसवराज पाटील,आमदार विक्रम काळे, मा.आ.सुजितसिंह ठाकूर,सुरेश बिराजदार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.

अजित पवार म्हणाले, निवडणूक गावकी भावकीची नाही तर इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळात 140 कोटी जनतेचा नेता निवडण्याची आहे. जसा घरात जसा घरात कारभारी योग्य असेल तर घर चालतं. घरात आर्थिक सुबत्ता, सुख, शांती नांदते. तसंच हा भारत देश आपलं घर आहे. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचे काम केलं आज जगात कुठेही गेलं तर भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा आणि चांगला असतो. ही कीमया केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याला भरघोस निधी दिला आहे कोणत्याही राज्यामध्ये जे मोठे मोठे प्रकल्प झाले त्यामध्ये निंमा निम्माहा केंद्राचा असतो आणि निम्मा हा राज्याचा असतो त्यामुळे जे दीडशे दोनशे कोटीचे प्रोजेक्ट प्रत्येक राज्यात झालेले आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीमुळे झाल्याचे दिसते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, आता नवीन कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे.  तीन कोटी लोकांना घर बांधून देण्याचा. यापूर्वी आदिवासी मागास समाजातील जनतेला घर मिळायची मात्र माझा भटका विमुक्त, अल्पसंख्यांक, मागास वर्गातील गरीब यांना सुद्धा या योजनेअंतर्गत घर मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही काम करतात ते मागचा पुढचा विचार करून करतात. आगामी काळात मोदी सरकार आले तर 300 युनिट पर्यंत ज्यांचा विज बिल येतं त्यांना वीज मोफत दिली जाणार आहे,  अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Previous Post

अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्यासाठी छातीचा कोट करू-पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत

Next Post

एकदा सासऱ्याला संधी दिली आता सुनेला संधी द्या -अजित पवारांचे धाराशिवमध्ये आर्त हाक

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
राजकीय

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

21 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
Next Post
एकदा सासऱ्याला संधी दिली आता सुनेला संधी द्या -अजित पवारांचे धाराशिवमध्ये आर्त हाक

एकदा सासऱ्याला संधी दिली आता सुनेला संधी द्या -अजित पवारांचे धाराशिवमध्ये आर्त हाक

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491307
Users Today : 6
Users Yesterday : 61
This Month : 697
Total Users : 38672
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group