Monday, September 14, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

लोकसभा निवडणुकीत मातृशक्तीची निर्णायक भूमिका-चित्रा वाघ

Rajkiy Katta by Rajkiy Katta
26 April 2024
in राजकीय
0
लोकसभा निवडणुकीत मातृशक्तीची निर्णायक भूमिका-चित्रा वाघ
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा –

ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे ही ठरवण्याची आहे. सत्य विरुद्ध असत्य आणि संस्कृतीच्या विरुद्ध विकृती अशी लढाई आहे. या लोकसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका जर कोणाची असेल तर ती तुमची आणि माझी म्हणजेच 50% मातृशक्तीची आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या मतदानाच्या हक्काची पूर्तता करा. मतदान करायला आवर्जून जा. विकासासाठी अर्चना पाटलांना निवडून द्या असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मतदारांना केले.

धाराशिवच्या लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी शौचालयापासून संसदेतील आरक्षणापर्यंत अनेक गोष्टी दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक मधून देखील मुक्तता दिली आहे. कॉँग्रेसच्या काळात केवळ मुस्लिम मतदारांची मत जातील म्हणून त्यांनी ट्रिपल तलाक  रद्द करण्याबाबत निर्णय घेतला गेला नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम भागिनींची सुद्धा ट्रिपल तलाकच्या जाचातून सुटका केली. त्यामुळे भाजप सरकार मुस्लिम विरोधी किंवा महिला विरोधी आहे, हा प्रचार खोटा असल्याचे दिसून येते.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मराठवाड्यात आले होते. तेव्हा त्यांनी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि मोडकळीस आलेल्या काँग्रेस या पक्षांचा उल्लेख केला त्यानंतर या पक्षांच्या नेत्यांचे डोकी फिरली आहेत. काहीही विधान करत देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुत्वाला बाजूला ठेवून नकली शिवसेना काँग्रेस बरोबर गेली आणि आता महाराष्ट्रद्वेषी सुद्धा झाली. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहेतच पण त्याही याधी या देशाच्या एक महिला आहेत. मात्र त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने त्यांनी नवनीत राणा यांच्यावर वैयक्तिक टीका केली. हे नाव घेतात शिवाजी महाराजांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं आणि महिलांवर टीका करतात ही नकली शिवसेना आहे.

विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही. त्यासाठी अजित पवार यांनी वेगळे होत विकासाची पाऊल वाट नाही तर एक्सप्रेस हायवे धरला आहे. म्हणून आपल्यालाही विकासाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे ही चित्रा वाघ यांनी आवर्जून सांगितले.

Previous Post

मोदींच्या नावाने निवडून आलेला उमेदवार आता म्हणतो, कोण मोदी?-मल्हार पाटील यांचे टिकास्त्र

Next Post

आ.विक्रम काळे यांनीही लाव रे तो व्हिडिओ म्हणत ओमराजे निंबाळकर यांची केली पोलखोल

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
राजकीय

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

21 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
Next Post
आ.विक्रम काळे यांनीही लाव रे तो व्हिडिओ म्हणत ओमराजे निंबाळकर यांची केली पोलखोल

आ.विक्रम काळे यांनीही लाव रे तो व्हिडिओ म्हणत ओमराजे निंबाळकर यांची केली पोलखोल

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491309
Users Today : 8
Users Yesterday : 61
This Month : 699
Total Users : 38674
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group