Sunday, August 2, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

परंडा विधानसभेचा आमदार हा ओबीसीचा असेल-लक्ष्मण हाके

Rajkiy Katta by Rajkiy Katta
26 August 2024
in Blog
0
परंडा विधानसभेचा आमदार हा ओबीसीचा असेल-लक्ष्मण हाके
0
SHARES
155
VIEWS

ओबीसी बांधवांच्या हितासाठी  छातीचा कोट केल्याशिवाय राहणार नाही

रोहित चंदनशिवे भूम

माझ्या तमाम ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी मी छातीचा कोट केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन प्रा लक्ष्मण हाके यांनी भूम येथील ओबीसी जनजागृती मेळाव्यामध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित करताना केले.


या ओबीसी जनजागृती मेळाव्याचे आयोजन समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.
पुढे बोलताना प्रा. हाके म्हणाले की, सावंत म्हणाले मी मराठा बांधव म्हणून मी जरांगे पाटील यांना भेटायला गेलो आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कधी ओबीसी आरक्षण बाबत संसदेत एक शब्दही बोलले नाहीत. माजी आमदार राहुल मोटे, मंत्री तानाजी सावंत यांनी आपण मदत करूनसुद्धा कधीही कोणत्याही ओबीसी बांधवाच्या आंदोलन, उपोषणास कधीही पाठिंबा दिला नाही. यांना आपण मते देऊन आमदार खासदार केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपणाला शासनकर्ती जमात बनायचे आहे.ओबीसी समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यावर व्यक्त होत नाहीत. येणारा आमदार हा  ओबीसीचा असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. तुमच्या आमच्या हक्काची, अधिकाराची ही लढाई असून हक्क मागून नाहीतर रस्त्यावर उतरून युद्ध जिंकून घेयची असतात. महाराष्ट्र मध्ये  ओबीसी बांधवांची संख्या  बहुसंख्य असून आपण एकत्र येणे गरजेचे आहे. आपले अस्तित्व टिकणे महत्त्वाचे आहे.मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीमधून देऊ नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांची आहे.


  २८८ आमदारांपैकी किती आमदारांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नावर किती बोललात? हे सांगावे. आज मनोज जरांगे पाटील यांना सर्व आजी-माजी आमदार, खासदार पाठिंबा देत आहेत. पण ओबीसीच्या साठी बसलेल्या उपोषण स्थळी एकही आमदार पाठिंबासाठी का आला नाही   अशी विचारणाही लक्ष्मण हाके यांनी केली. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोकराव चव्हाण यांनी दोन ते तीन वेळा भेट घेतली. शरद पवार हे पण भेटले. आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चारही मुख्यमंत्र्यांना राज्यात सामाजिकदृष्ट्या मागास, बारा बलुतेदार राहतात याचे थोडेसुद्धा सोयरे सुतक नसावे. हे मंत्री ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत. यांना फक्त जरांगेंच्या मतांची काळजी पडली. पण, ओबीसी बांधवांच्या मतांचे काही पडलेले नाही, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली.मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीमधून देऊ नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांची आहे.यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रवीण रणबागुल आक्रमक…
  वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण बागुल यांनी उपस्थितांना प्रश्न उपस्थित करत म्हणाले की ज्यांना पिढ्यानपिढ्या तुम्ही मतदान करता परंतु ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या पाठीशी उभारणारा किंवा प्रश्न विचारणारा एकही माय का लाल शिल्लक नाही अशा जहरी शब्दात  टीका केली.

Previous Post

भूम परांडा वाशी पुणे रहिवासी, बांधवांचा ‘कौटुंबिक स्नेह मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न..

Next Post

अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Related Posts

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
Blog

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..

31 July 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

31 July 2026
“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
Next Post
अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Recent Posts

  • आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
  • सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

489131
Users Today : 17
Users Yesterday : 38
This Month : 55
Total Users : 36496
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group