Saturday, May 30, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे राज्यपाल नियुक्त आमदार होणार?

Rajkiy Katta by Rajkiy Katta
6 September 2024
in Blog
0
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे राज्यपाल नियुक्त आमदार होणार?
0
SHARES
734
VIEWS

मुंबई राजकीय कट्टा वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये सहा जागा भारतीय जनता पार्टीला,राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला
प्रत्येकी तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे नेहमीच अग्रेसर असतात. राज्यातील विविध नामांकित व्यक्तींचा थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणून देऊन ‘सामान्य लोकांचा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा करण्यात चिवटे यांचा मोठा वाटा आहे. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विश्वासातील असून राज्यात ज्यावेळी सत्तांतर झाले. त्यावेळी पडद्यामागे चिवटे यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. त्यामुळे मंगेश चिवटे हे राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून विधिमंडळात जाणार असल्याची चर्चा सध्या मंत्रालय परिसरात जोरदार सुरू आहे.

मंगेश चिवटे हे करमाळा तालुक्यातील असून ते स्वतः अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. २०१७ नंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्राला राम-राम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेऊन आरोग्य क्षेत्रात त्यावेळेस पासून ते कार्य करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याचे देखील सध्या बोलले जात आहे.परवाच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंगेश चिवटे यांच्या कार्याचे कौतुक केले असून हे कौतुक त्यांना विधान परिषदेच्या सभागृहात घेऊन जाईल अशी देखील राजकीय जाणकार चर्चा करत आहेत.

Previous Post

निम्न तेरणा उपसा सिंचन योजना लवकर मार्गी लावणार-शिवसेना प्रवक्ते योगेश केदार.

Next Post

नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी

Related Posts

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
Blog

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

18 May 2026
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
Blog

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

15 May 2026
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
Blog

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

15 May 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

22 April 2026
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी
Blog

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

22 April 2026
Next Post
नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी

नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486616
Users Today : 5
Users Yesterday : 28
This Month : 1137
Total Users : 33981
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group