उबाठाचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी युवासेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांचा समर्थकांसह प्रवेश;
भूम (प्रतिनिधी) : भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी युवासेना जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि समर्थकांसह भूम परंडा वासी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. एकाच वेळी मोठ्या पाथरूड जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरल्याने भूम तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांवर या प्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारांनी प्रेरित होऊन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून हा प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डॉ.चेतन बोराडे यांच्यासोबत महिला जिल्हा संघटिका सौ. कल्याणी डोके बोराडे, पाथरूडचे विभागप्रमुख गजेंद्र दत्तात्रय खुणे, इटचे विभागप्रमुख प्रवीण भोसले, युवा नेते भाऊसाहेब बोराडे, पदवीधर तालुका समन्वयक कैलास ढेपे, दुधोडीचे शाखाप्रमुख गणेश कालवडकर, विधानसभा समन्वयक विनोद रेडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यामध्ये बाजीराव माने, बळीराम गटकळ, तात्यासाहेब लांडे, शेखर वाघमारे, दत्ता नेरे, सोमनाथ गावडे, कृष्णा चव्हाण, नारायण तिकटे, संदीपान पवार, शुभम तिकटे, योगेश बोराडे, मनोज कालवडकर, वसुदेव अडसूळ, सिद्धी बोराडे, सदाशिव गव्हाणे, संजय कालवडकर, हरिदास पाखले, बन्सी हनुमंत बोराडे, महेश बोराडे, विलास भसाड, बबनदादा बोराडे, सहदेव बोराडे, प्रशांत लोंढे, शिवाजी डोके, संजय खुणे, वसंत खुणे, संतोष गजरे, शाम महामुनी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत करण्यात आले. भूम शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डॉ.चेतन बोराडे यांच्यासारख्या संघटनात्मक अनुभव असलेल्या पदाधिकाऱ्याने समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा संघटनात्मक धक्का, तर शिंदे यांच्या शिवसेनेसाठी बळवर्धक घडामोड मानली जात आहे.
विशेषतः पाथरूड, इट, दुधोडी तसेच भूम तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी या प्रवेशात सहभागी झाल्यामुळे याचा प्रभाव केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवरही पडू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या पक्षप्रवेशाला त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पक्षप्रवेशावेळी बाळासाहेब मांगले, राहुल डोके, सुनील भोईटे, युवराज हुंबे, चंद्रकांत सरडे, युवराज कोकाटे, वैजिनाथ म्हमाणे, डॉ. विद्याधर बोराडे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. चेतन बोराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे भूम तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत असून, आता ठाकरे गट या राजकीय घडामोडीला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.













Users Today : 65
Users Yesterday : 25
This Month : 540
Total Users : 38515