प्रा.डॉ.आ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास; पारा जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद वाढली
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास ठेवून वाशी तालुक्यातील उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी युवासेना वाशी तालुकाप्रमुख गणेश भराटे यांच्या नेतृत्वाखाली डोंगरेवाडी तसेच वाशी तालुक्यातील नंदकुमार भराटे, गुरुजी कुरुंद, वसुदेव कुरुंद, शिवाजी भराटे, महेश भराटे, विकास भराटे, बिभीषण कुरुंद, सार्थक भराटे, अनिकेत माळी, अनिल भराटे, नंदकुमार सुकाळे, विकास आढाव, ज्ञानेश्वर जाधव, हनुमंत आजब, नवनाथ पठारे, सुखदेव माळी, राम शिरसागर पाटील, सागर शेठ नकाते, अजय भराटे, प्रवीण कुरुंद, बालाजी कुरुंद, आबा तावरे, धनंजय कुरुंद, विशाल भराटे, अशोक कुरुंद आणि नवनाथ भराटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.
आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांमुळे प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रा. डॉ. सावंत यांनी स्वागत करून त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेश सोहळ्यास नागनाथ बापू नाईकवाडी, शिवहार स्वामी, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण, सुनील उंदरे, सुनील जाधवर, सोमनाथ शिंदे, दिनकर शिंदे, माऊली देशमुख यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश भराटे यांच्यासारख्या युवा पदाधिकाऱ्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने वाशी तालुक्यासह पारा जिल्हा परिषद गटात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे. आगामी काळात पक्षसंघटन वाढविण्यासोबतच परिसरातील विकासकामांना आणखी गती मिळेल, असा विश्वास यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.












Users Today : 4
Users Yesterday : 89
This Month : 634
Total Users : 38609