Friday, July 31, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..

Rajkiy Katta by Rajkiy Katta
31 July 2026
in Blog
0
आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
0
SHARES
0
VIEWS

सोनारी जि.प. शाळेत गणित व विज्ञान शिक्षकांची तातडीने नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवरील कार्यवाही


परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनारी येथे गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांची पदे दीर्घकाळ रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती मिळताच आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत प्रशासनाला कठोर शब्दांत सूचना दिल्या. त्यांच्या एका दूरध्वनीनंतर अवघ्या २४ तासांच्या आत शाळेत दोन्ही विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

सोनारी येथील विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान या महत्त्वाच्या विषयांचे नियमित अध्यापन मिळत नसल्याने पालकांमध्येही नाराजीचे वातावरण होते. ही बाब समोर येताच आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी धाराशिवचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषद प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाने युद्धपातळीवर कार्यवाही करत अवघ्या २४ तासांत शिक्षकांची नियुक्ती पूर्ण केली.

या तातडीच्या निर्णयामुळे सोनारी येथील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शाळेतील अध्यापनाची नियमितता पुन्हा पूर्ववत झाली आहे. पालक आणि ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

“विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे एका विद्यार्थ्याचेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. ज्या ठिकाणी अशा समस्या निर्माण होतील, त्या तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी मी कायम कटिबद्ध असून आवश्यक तेथे तत्काळ हस्तक्षेप करत राहीन.”

आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

Previous Post

सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

Related Posts

भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

31 July 2026
“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
Blog

“ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

28 June 2026
१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
Blog

१८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत

24 June 2026
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?
Blog

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

23 June 2026
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?
Blog

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे समन्यायी वाटप करा-जिल्हा परिषद शिवसेना गटनेते विकी चव्हाण यांची मागणी

24 June 2026
कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी
Blog

कोणता झेंडा घेऊ हाती?दोन दादांच्या राजकीय दरीत कार्यकर्त्यांची कोंडी

18 June 2026

Recent Posts

  • आमदार डॉ.तानाजीराव सावंतांचा’ एक फोन अन् अवघ्या २४ तासांत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी…..
  • सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करू नका; मतभेद संघटनेच्या व्यासपीठावरच मांडा – दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
  • “ओमराजे वाघ नव्हे, लांडगा निघाला”; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात
  • १८ कोटींच्या निधीवरून धाराशिवमध्ये श्रेयवाद; खा.ओमराजे-आ.राणा पाटील यांच्यातील लेटर वॉर पुन्हा चर्चेत
  • धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त; नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता?

Recent Comments

No comments to show.

Counter

489044
Users Today : 36
Users Yesterday : 34
This Month : 1123
Total Users : 36409
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group