शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे करण्यात आली आहे.

पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, ‘लाडकी बहीण’ म्हणून ज्या पद्धतीने राज्यसभेवर ज्योती वाघमारे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला संधी देण्यात आली, त्याच धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातूनही ‘लाडकी बहीण’ म्हणून भारतीताई गायकवाड यांच्या नावाचा विचार विधानपरिषदेसाठी करण्यात यावा.

भारतीताई गायकवाड या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला असून महिला जिल्हाप्रमुख म्हणून अनेक महिलांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. तसेच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपळगाव डोळा हे गाव तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

यासोबतच त्यांनी विधवा, परित्यक्ता आणि एकल महिलांसाठीही उल्लेखनीय काम केले आहे. अनेक महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप, तसेच शासकीय योजनांअंतर्गत पगारी सुविधा सुरू करून देण्यासारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवक नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार व माजी मंत्री व भूम परंडा वाशीचे आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.


या सर्व सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.













Users Today : 24
Users Yesterday : 20
This Month : 1128
Total Users : 33972