Monday, May 25, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान

Rajkiy Katta by Rajkiy Katta
21 March 2026
in Blog
0
0
SHARES
152
VIEWS


मराठी चित्रपट कलवरी हा थिएटरनंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही सुपरहिट ठरत आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर 14 मार्च रोजी YouTube वरील Raafilms चॅनलवर रिलीज करण्यात आल्यानंतर या चित्रपटाने लोकप्रियतेची नवी उंची गाठली आहे.


अवघ्या काही दिवसांतच ‘कलवरी’ने 10 लाख (1 मिलियन) व्ह्यूजचा टप्पा पार करत युट्यूबवरही आपली छाप पाडली आहे. ग्रामीण जीवनाचे अस्सल आणि वास्तवदर्शी चित्रण, प्रभावी कथानक आणि कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत.
या चित्रपटाचे निर्माते विकास कुटे हे सोनगिरी (ता. भूम) येथील रहिवासी असून, त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच चित्रपट निर्मितीची आवड असलेल्या विकास कुटे यांनी ‘कलवरी’च्या माध्यमातून आपले स्वप्न साकार केले आहे. त्यांचा स्वतःचा प्रवास ग्रामीण भागातून झाल्यामुळे चित्रपटात त्यांनी अत्यंत वास्तवदर्शी दृश्ये उभी केली आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना गावाकडच्या जीवनाचा खरा अनुभव मिळतो.


चित्रपटाचे इतर निर्माते राणी टोणगे असून, दिग्दर्शन प्रदीप टोनगे आणि मंगेश शेंडगे यांनी केले आहे. निर्माते विकास कुटे यांनी सांगितले की, युट्यूबवरील प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया वाचताना भावनिक वाटते आणि नव्या चित्रपट निर्मितीसाठी प्रेरणा मिळते.
चित्रपटात राहूल दराडे, राजेश्वरी खरात, सुजित चौरे, अंकिता राऊत, सिद्धेश्वर झाडबुके यांच्यासह सत्तरपेक्षा अधिक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
तसेच, चित्रपटाच्या निर्मितीत स्थानिक ग्रामस्थांचेही मोठे योगदान लाभले आहे. विशेषतः सोनगिरी (ता. भूम) आणि पिंपळगाव कवडा येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.
निर्माते विकास कुटे यांनी धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, “हा चित्रपट थिएटरमध्ये पाहणे अपेक्षित होते; मात्र आता किमान आपल्या भागातील निर्मात्याचा हा चित्रपट युट्यूबवर तरी सर्वांनी पाहावा.”
एकंदर, ‘कलवरी’ हा चित्रपट स्थानिक पातळीवर तयार होऊन राज्यभर गाजत असून, आता डिजिटल माध्यमातही मोठे यश मिळवत आहे.

Previous Post

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड; शिवसेना-राष्ट्रवादीतून ‘या’ नावांची चर्चा

Related Posts

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
Blog

उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर

20 May 2026
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
Blog

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

18 May 2026
आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
Blog

आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती

15 May 2026
शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
Blog

शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी

15 May 2026
भारतीय जनता पार्टीकडून धाराशिव जिल्ह्यातील आठ मंडळ अध्यक्षांची नवीन नियुक्ती
Blog

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

22 April 2026
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी
Blog

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

22 April 2026
Next Post
धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड; शिवसेना-राष्ट्रवादीतून ‘या’ नावांची चर्चा

धाराशिव जिल्हा परिषदेत आज सभापती निवड; शिवसेना-राष्ट्रवादीतून ‘या’ नावांची चर्चा

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486489
Users Today : 11
Users Yesterday : 29
This Month : 1010
Total Users : 33854
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group