Tuesday, May 26, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

Rajkiy Katta by Rajkiy Katta
10 March 2026
in राजकीय
0
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
0
SHARES
969
VIEWS

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

​धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन तब्बल चार वर्षे उलटल्यानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. पंचायत समिती सभापती पदांच्या निवडी पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. महायुतीमध्ये वर्चस्वासाठी सुरू असलेली ‘रस्सीखेच’ आणि दिग्गज नेत्यांमधील अंतर्गत कलहामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे.

​बलाबल आणि मॅजिक फिगर

​५४ सदस्य संख्या असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २८ या जादुई आकड्याची गरज आहे. सध्याचे पक्षीय चित्र खालीलप्रमाणे आहे:

  • ​भाजप: १९
  • ​शिवसेना (शिंदे गट): १५
  • ​शिवसेना (ठाकरे गट): ०७
  • राष्ट्रवादी काँग्रेस -06
  • ​काँग्रेस: ०३
  • ​अपक्ष: ०४
  • ​समाजवादी पक्ष: ०१

​दोन दिग्गजांमधील ‘पॉवर गेम’

​जिल्ह्याचे राजकारण सध्या आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार डॉ. तानाजी सावंत या दोन नेत्यांभोवती फिरत आहे. भाजपकडे १९ सदस्यांचे संख्याबळ असल्याने अर्चनाताई पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेच्या (शिंदे गट) उषा गायकवाड यांच्या नावासाठी तानाजी सावंत गट आग्रही असल्याचे समजते.

​सदस्यांची ‘वारी’ आणि नेत्यांची ‘फिल्डिंग’

​अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख जवळ येत असतानाच फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्य एकत्र तर शिवसेना पक्षाचे सदस्य त्यातही दोन गट आहेत एका गटात आठ आणि दुसऱ्या गटात सात असे सदस्य महिनाभरापासून ‘सहलीवर’ आहेत. दुसरीकडे, शिवसेनेचे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीसाठी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. महिनाभरापासून घरापासून दूर असलेल्या काही सदस्यांमध्ये आता अस्वस्थता असून, “निवडी कधी होतील आणि आम्ही घरी कधी जाऊ?” अशी भावना व्यक्त होत आहे.

​ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची भूमिका ठरणार निर्णायक?

​आ.राणा पाटील आणि आ.डॉ.तानाजी सावंत यांच्यातील वादाचा फायदा आपला गट कसा करून घेईल, याकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लक्ष लागले आहे. जर महायुतीतील दोन्ही गटांचे मतभेद विकोपाला गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

​अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने?

​ऐनवेळी अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की शिवसेनेकडून एखादे नवीन नाव समोर येणार? किंवा धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण उदयास येणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्तेच्या या सारीपाटात कोण कोणाला मात देणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Previous Post

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

Next Post

शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?

Related Posts

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
राजकीय

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

31 October 2025
Next Post
शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?

शिवसेना गटनेतेपदी विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या निवडीची शक्यता?

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486504
Users Today : 2
Users Yesterday : 24
This Month : 1025
Total Users : 33869
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

WhatsApp us

WhatsApp Group