Monday, September 14, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली मस्साजोग येथील देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट

Rajkiy Katta by Rajkiy Katta
24 December 2024
in राजकीय
0
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली मस्साजोग येथील देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट
0
SHARES
81
VIEWS

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने कुटुंबास आर्थिक मदत..

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणाने हत्या करण्यात आली. या हत्येमधील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही अशी शासनाची भूमिका आहे. याबाबत विश्‍वास देण्यासाठी व देशमुख कुटुंबीयांना शासन त्यांच्यासोबत खंबीरपणे आहे ही हमी देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. असे आश्‍वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. शिवसेनेच्या वतीने देशमुख कुटूंबीयांना आर्थिक मदतही देण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. उदय सामंत यांनी गावकऱ्यांसोबत देखील चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणी एस आय टी गठीत करण्यात आलेली असून न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर दोषीना शिक्षा व्हावी तसेच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत असेही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

आता नवनिर्वाचित महायुतीच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकांशी बोललो तेव्हा मलाही भीती वाटल्याची कबुली मंत्री शिरसाट यांनी दिली. परंतु या हत्याकांडामध्ये आरोपी अटक केल्यानंतर गुप्तता पाळली जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला राजकारणामध्ये आणू नका. विरोधक आणि सत्ताधारी काय म्हणतात, त्यामध्ये रस नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. यात देशमुख यांच्या हत्येमध्ये ज्यांचा हात असेल तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे’ असेही यावेळी मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आर्थिक मदत

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली. आणि पुढील घराची जबाबदारी सुद्धा घेतली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत व सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, अविनाश जाधव, सुमित कोळपे, अजय सूरवसे, सुरज चुंगडे यांच्या हस्ते संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, भाऊ धनंजय यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.

Previous Post

धाराशिव पालकमंत्री कोण होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष,हे होऊ शकतात पालकमंत्री

Next Post

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस जाहिरातीतून पुतण्याकडून काकाचा फोटो गायब

Related Posts

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल
राजकीय

हा विश्वासघातच नाही का? नगरसेवक संजय मुंदडा व सहकाऱ्यांचा जुन्या पक्षनेतृत्वाला थेट सवाल

22 August 2026
“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले
राजकीय

“मतदारांनी विरोधक निवडले, नगरसेवकांनी सत्ता निवडली!”; कळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बॅनरने शहरात राजकीय वातावरण तापले

21 August 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
Next Post
उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस जाहिरातीतून पुतण्याकडून काकाचा फोटो गायब

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस जाहिरातीतून पुतण्याकडून काकाचा फोटो गायब

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491321
Users Today : 20
Users Yesterday : 61
This Month : 711
Total Users : 38686
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group