धाराशिव प्रतिनिधी-राज्यातील सत्ता स्थापन करून महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. आता खातेवाटप व पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.राज्यमंत्री मंडळात धाराशिवला स्थान न मिळाल्यामुळे आता पालकमंत्री आपल्या मर्जीतील असावा यासाठी माजी पालकमंत्री आ.डॉ.तानाजी सावंत व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे प्रयत्नशील असतील हे मात्र नक्की.
धाराशिव जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून राज्यात परिचित आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री असावा अशी अपेक्षा होती मात्र मंत्रीमंडळात कुणालाच स्थान न मिळाल्यामुळे आता बाहेरचा पालकमंत्री असणार आहे. गेल्यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना पक्षांकडे होते.आता मात्र भाजप व शिवसेना शिंदे गट ही पालक मंत्री पदासाठी आग्रही असणार आहेत. त्यातच महायुतीतील घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील नेते देखील जिह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री हा आपल्या पक्षाचा व्हावा याकरिता उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
हे होऊ शकतात पालकमंत्री
शिवसेना या पक्षाला जर पालकमंत्री पद दिले गेले तर यासाठी ना.संजय सिरसाट,ना.प्रताप सरनाईक,ना.योगेश कदम यांची नावे चर्चेत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून ना.बाबासाहेब पाटील किंवा ना.धनंजय मुंडे हे पालकमंत्री म्हणून येऊ शकतात तर भाजपाकडून ना.पंकजा मुंडे,ना.अतुल सावे किंवा ना.जयकुमार गोरे यांची नावे चर्चेत आहेत पण यातील धाराशिव जिल्हा पालकमंत्री पद कुणाकडे जाणार याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व ना.अजित पवार हेच ठरवणार आहेत मात्र कार्यकर्ते आपल्या सोयीचा पालकमंत्री व्हावा यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत.













Users Today : 1
Users Yesterday : 40
This Month : 1150
Total Users : 30835