प्रा.डॉ.तानाजीराव सावंत,प्रा.शिवाजीराव सावंत, (चेअरमन, भैरवनाथ शुगर्स समुह) यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय सावंत यांच्या हस्ते १७ वा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने पूजन करून बॉयलर प्रदिपन केला गेला.कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अविनाश वाडेकर,दत्ता साळुंखे ,गजेंद्र सूर्यवंशी, अविनाश देशमुख, रामभाऊ पवार ,रामभाऊ शेळके, लक्ष्मण मोरे, बप्पा जाधव, ठोंबरे साहेब, काळे साहेब ,भोसले साहेब, गडगे साहेब ,गोविंद कुलकर्णी, सिंग साहेब ,सुरेश साळुंखे , सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. तसेच यावेळी पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक, तोडणी ठेकेदार सर्व खाते प्रमुख ,विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत असताना ,या हंगामात उच्चांकी गाळप करत यशस्वीपणे कारखाना चालवण्याचा संकल्प श्री .धनंजय सावंत यांनी व्यक्त केला. “साखर उद्योग हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा आहे, त्यामुळे त्यांची प्रगती आमची जबाबदारी आहे,” अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.












Users Today : 30
Users Yesterday : 77
This Month : 1606
Total Users : 27034