मुंबई राजकीय कट्टा वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये सहा जागा भारतीय जनता पार्टीला,राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला
प्रत्येकी तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे नेहमीच अग्रेसर असतात. राज्यातील विविध नामांकित व्यक्तींचा थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणून देऊन ‘सामान्य लोकांचा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा करण्यात चिवटे यांचा मोठा वाटा आहे. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विश्वासातील असून राज्यात ज्यावेळी सत्तांतर झाले. त्यावेळी पडद्यामागे चिवटे यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. त्यामुळे मंगेश चिवटे हे राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून विधिमंडळात जाणार असल्याची चर्चा सध्या मंत्रालय परिसरात जोरदार सुरू आहे.

मंगेश चिवटे हे करमाळा तालुक्यातील असून ते स्वतः अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. २०१७ नंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्राला राम-राम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेऊन आरोग्य क्षेत्रात त्यावेळेस पासून ते कार्य करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याचे देखील सध्या बोलले जात आहे.परवाच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंगेश चिवटे यांच्या कार्याचे कौतुक केले असून हे कौतुक त्यांना विधान परिषदेच्या सभागृहात घेऊन जाईल अशी देखील राजकीय जाणकार चर्चा करत आहेत.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252