आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव संभाजी शिंदे साहेब यांची वर्षा निवासस्थानी युवा सेना राज्य समन्वयक तथा शिवसेना धाराशिव जिल्हा निरीक्षक मा नितीन दादा लांडगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ यांचे शिष्टमंडळ यांनी मुंबई येथे भेट घेतली ही भेट दिनांक २९ जून रोजी कळंब येथे कार्यरत असलेले एसटी कर्मचारी सच्छिदानंद पुरी यांनी टॉवरवर चडून केलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री साहेब आणि पुरी यांचे मोबाईल फोन वरून बोलणे लांडगे यांनी करून देवून आंदोलनकर्ते पुरी यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाखातर आंदोलन स्थगित करून भेट घेण्याचे ठरले आणि ठरल्याप्रमने आज मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली सदरील भेटीदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे विविध विषय मार्गी लावण्याचे आवाहन शिष्टमंडळातर्फे करण्यात आले या आवाहनाला मुख्यमंत्री साहेबांनी पूरक आणि प्रशासकीय चर्चेतून मार्ग काढणार असल्याचे वचन साहेबांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना व शिष्टमंडळ यांना दिले तसेच सदरील भेटीचे पूर्व नियोजन करणारे मा. नितीनजी लांडगे यांचे देखील आभार एसटी कर्मचाऱ्यांनी मानले.
यावेळी उपस्थित संजय मुंदडा, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप,युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस निखिल घोडके समवेत युवा सैनिक उपस्थित होते.












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242