Tuesday, May 26, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
31 October 2025
in राजकीय
0
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
0
SHARES
47
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी):
धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये राजकीय स्पर्धा आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की,

“तुम्ही निधी आणलात म्हणून आम्ही विरोध करतो आणि आम्ही निधी आणला तर तुम्ही विरोध करता — हा अनावश्यक राजकीय खेळ आता धाराशिवकरांच्या अंगलट येत आहे. या अनावश्यक स्पर्धेमुळे गेल्या दोन वर्षांपासून धाराशिव शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना खीळ बसली आहे.”

डॉ.पाटील पुढे म्हणाले की,

“राजकारण करण्यासाठी निवडणुका हे योग्य व्यासपीठ आहे. त्या काळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. मात्र, निवडणुका नसताना सर्व लोकप्रतिनिधींचा एकमेव उद्देश ‘धाराशिवचा विकास’ हाच असला पाहिजे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वच पक्ष, नेते आणि प्रतिनिधींनी एकत्र येऊन निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

त्यांनी पुढे आवाहन केले की,

“धाराशिव जिल्ह्याची ‘मागास जिल्हा’ ही ओळख पुसण्यासाठी एकात्मता आणि सहकार्याची गरज आहे. ‘मी मोठा की तू मोठा’ या स्पर्धेत न पडता, विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करणे हीच काळाची मागणी आहे.”

डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी शेवटी अपेक्षा व्यक्त केली की,

“धाराशिवच्या जनतेचा विकास आणि जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वरचा मुद्दा असावा. या भावनेतूनच आपण सर्वांनी जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची नितांत गरज आहे.”

Previous Post

धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुखपदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती

Next Post

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025

Recent Posts

  • उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषदेसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी; सुनील चव्हाण आघाडीवर
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून डॉ.प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
  • आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला; तेरखेडा जिल्हा परिषद गटातील शेतरस्त्यांच्या कामांना गती
  • शिवसेनेत सुरज साळुंखे यांच्यावर मोठी जबाबदारी
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी विधानपरिषदेवर जाणार?

Recent Comments

No comments to show.

Counter

486504
Users Today : 2
Users Yesterday : 24
This Month : 1025
Total Users : 33869
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group