शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि युवासेना राज्य उपसचिव मनिषा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा युवती सेना प्रमुख (जिल्हा युवती सेना अधिकारी) पदी श्वेताताई सागर दुरुगकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज त्यांच्या नियुक्तीची घोषणा दैनिक सामना या वर्तमानपत्रातून करण्यात आली.त्यांच्याकडे धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून श्वेताताई दुरुगकर यांचे अभिनंदन होत आहे.













Users Today : 17
Users Yesterday : 77
This Month : 1593
Total Users : 27021