Sunday, March 22, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

धाराशिव भाजपचा ४७ वा ‘जनता दरबार’ खामसवाडीत उत्साहात पार

Rajkiy Katta by Rajkiy Katta
3 July 2025
in राजकीय
0
धाराशिव भाजपचा ४७ वा ‘जनता दरबार’ खामसवाडीत उत्साहात पार
0
SHARES
68
VIEWS

धाराशिव, ता. 3:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजपकडून सुरू असलेल्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ४७ वा ‘जनता दरबार’ कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे संपन्न झाला.

या दरबारात मल्हार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, व भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.

२,८७२ पैकी २,१४९ तक्रारींवर कार्यवाही

जिल्हाभरात आजपर्यंत झालेल्या ४७ जनता दरबारांमध्ये एकूण 2,872 तक्रारींची नोंद झाली असून, यापैकी 2,149 तक्रारींवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने तत्काळ कार्यवाही करण्यात आली. उर्वरित तक्रारींचे निरसन संबंधित विभागांमार्फत प्रक्रियेत आहे.

खामसवाडी येथील दरबारात न्यायालयीन व धोरणात्मक विषय वगळता स्थानिक समस्यांवर थेट जागेवरच तोडगा काढण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत तक्रारी नोंदवण्यात आल्या.

कार्यकर्त्यांची आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

या दरबारात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, संजय पाटील, कळंब तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, दत्ता साळुंखे, वैभव मुंडे, महिला मोर्चा पदाधिकारी छाया बोंदर, माणिक बोंदर, किरण पाटील, तसेच भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नागरिकांमध्ये समाधान व विश्वासाचे वातावरण

गावपातळीवर थेट संवाद व समस्यांचे तातडीने निरसन या दरबारांच्या वैशिष्ट्यांमुळे नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उपक्रम भाजपच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे प्रतिक ठरत आहे.

Previous Post

आनंद पाटील यांची युवा सेनेच्या धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी निवड

Next Post

भुम-अमृत 2 योजना समर्थनार्थ महिलांचा मोर्चा

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post

भुम-अमृत 2 योजना समर्थनार्थ महिलांचा मोर्चा

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483432
Users Today : 3
Users Yesterday : 139
This Month : 1112
Total Users : 30797
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group