महाराष्ट्रात काका पुतण्या यांच्यामध्ये वर्चस्ववादाच्या लढाईतून अनेक काका पुतण्या यांच्यामध्ये राजकीय भांडण झालेले पाहायला मिळाले.राज्यात काका पुतण्यांचे आदर्श उदाहरण म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व खा.शरद पवार यांच्याकडे पाहिले जात होते. या काका पुतण्यामध्ये कधीही बंड होणार नाही आणि पुतण्या काकाच्या पुढे जाणार नाही अशी चर्चा कायम असायची मात्र त्यांच्यामध्ये देखील 2023 मध्ये फूट पडली आणि पुतण्याने काकांच्या विरोधात वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच स्वतःचा असल्याचा दावा केला.त्यामुळे राज्यातील या आदर्श उदाहरणाला देखील तडा गेला आहे.अनेक पुतण्यांनी काकांच्या विरोधात बंड केलेल आहे असेच बंड आता महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या विरोधात पृथ्वीराज शिवाजी सावंत हे करतात की काय? अशी चर्चा सध्या माध्यमात सुरू आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा काल वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका वर्तमानपत्रांमध्ये पृथ्वीराज सावंत यांनी वाढदिवसाची पूर्ण पान भरून जाहिरात दिली आहे मात्र या जाहिरातीमध्ये त्यांचे काका असणारे डॉ.तानाजी सावंत यांना मात्र स्थान मिळालेले नाही.या जाहिरातीत हा फोटो नजर चुकीने तर नक्कीच राहणार नाही हे मात्र नक्की. सावंत कुटुंबांची ओळख ही डॉ.तानाजी सावंत आहेत आणि मूळ ओळखीला कोणीही विसरू शकणार नाही.या जाहिरातीतून जर जाणीवपूर्वक डॉ.तानाजी सावंत यांना वगळलं असेल तर नक्कीच ही सावंत घराण्यात देखील फूट पडणार का या चर्चेला उधाण आले आहे. अगोदरच विधानसभेला अनिल सावंत या एका पुतण्याने डॉ.तानाजी सावंत यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे आता हा दुसरा पुतण्या देखील काकांच्या विरोधात जाणार का याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहे.

महाराष्ट्रात यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे,गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, शरद पवार- अजित पवार अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या घरी देखील पुतण्यांनी काकांच्या विरोधात बंड पुकारले होते आता यामध्ये आणखी एका काका पुतण्याची भर पडण्याची शक्यता दिसून येत आहे.












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244