भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात रोज नवनवीन घडामोडी घडत असून वाशी तालुक्यातील एक नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेवर असून आज धाराशिव येथे होणाऱ्या आमदार कैलास पाटील यांच्या प्रचार सभेत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
अनेक दिवसापासून हा नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र मध्यंतरी मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर या नेत्याचे नाव जरांगे पाटील यांच्याकडून देखील भूम परंडा वाशी मतदारसंघातून चर्चेत होते. मात्र त्यांनी उमेदवार न दिल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्यात आले असून आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा धाराशिव येथे होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.












Users Today : 24
Users Yesterday : 67
This Month : 1816
Total Users : 27244