Tuesday, September 15, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवा-जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांना खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिले जोमाने कामाला लागण्याचे आदेश

Rajkiy Katta by Rajkiy Katta
7 August 2024
in Blog
0
कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवा-जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांना खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिले जोमाने कामाला लागण्याचे आदेश
0
SHARES
265
VIEWS

दिल्ली येथे खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची जिल्हाप्रमुख सुरज साळुंके व शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी घेतली भेट

धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे दिले आदेश

शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिल्ली येथे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील कार्याचा अहवाल यावेळी त्यांनी सादर केला. धाराशिव-कळंब विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे, ताकदीने कामाला लागा, असा कानमंत्र खा.डॉ.शिंदे यांनी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांना यावेळी दिला.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे काम जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी हाती घेतले आहे. धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सतत पाठपुरावा करुन त्यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व महायुती घटक पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून धाराशिव नगर परिषद अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी आणि रस्त्यांच्या कामाला नुकताच १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील वर्ग-१ जमिनी कायम ठेवण्यात बाबत देखील चर्चा करण्यात आली.
धाराशिव आणि कळंब ग्रामीण साठी २५-१५, ९५-५, ८५-१५ या योजने अंतर्गत मिळालेला निधी, धाराशिव येथील नवीन बसस्थानक बांधकाम, कळंब नगरपरिषद पाणीपुरवठा साठी ७० कोटी रुपये निधी, धाराशिव येथे नवीन ५०० बेड जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम, वैद्यकीय क्षेत्रातील काम व इतर विविध विकासकामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख या नात्याने जिल्ह्यात केलेल्या विविध कार्याचा अहवाल त्यांनी खा.डॉ.शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला.
या कार्य अहवालाचे वाचन करुन त्यांनी समाधान व्यक्त करीत आणखी नव्या जोमाने कामाला लागण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार उपस्थित होते

Previous Post

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवावी ही मागणी लोकांचीच-डॉ. प्रतापसिंह पाटील

Next Post

धाराशिवला 29 ऑगस्टला राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
धाराशिवला 29 ऑगस्टला राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा

धाराशिवला 29 ऑगस्टला राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491382
Users Today : 22
Users Yesterday : 59
This Month : 772
Total Users : 38747
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group