Monday, September 14, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

डॉ.पद्मसिंह पाटील यांनी उमरगा-औसा भागात केलेल्या कामामुळे माझा विजय निश्चित-अर्चनाताई पाटील

Rajkiy Katta by Rajkiy Katta
23 April 2024
in Blog, राजकीय
0
डॉ.पद्मसिंह पाटील यांनी उमरगा-औसा भागात केलेल्या कामामुळे माझा विजय निश्चित-अर्चनाताई पाटील
0
SHARES
7
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. धाराशिव मध्ये 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच रंगणार आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, काल त्यांनी उमरगा तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधत धाराशिवच्या विकासासाठी महायुतील साथ देण्याचे आवाहन केले. 

लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान उमरगा तालुक्यातील तुरोरी, कराळी परिसरातील निसर्गरम्य अचलबेट देवस्थान येथे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने सत्कार केल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन या निमित्ताने केले.. 

नाईचाकूर, नारंगवाडी, कवठा, राजेगाव येथे प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेऊन अर्चना पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला.. नारंगवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, डॉ.पद्मसिंह पाटील आणि या भागाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. किल्लारी भूकंप काळात साहेबांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे. पाटबंधारे मंत्री असताना साहेबांनी या भागात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव आणि सिंचनाच्या अनेक योजना राबवून हा भाग सुजलाम सुफलाम केला आहे.. साहेब खासदार असताना या मतदार संघातील ७०% पेक्षा जास्त गावांना खासदार निधी दिलेला आहे. त्यामानाने आजच्या खासदाराने किती निधी दिला हा संशोधनाचा भाग आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद उपाध्यक्षा असताना शाळा, तीर्थक्षेत्र, रस्ते, आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. या भागात आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी आपल्या हक्काच्या महायुतीला साथ द्यावी असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले..

श्री क्षेत्र कल्लेश्वर देवस्थान, कलदेव निंबाळा येथे यात्रेनिमित्त अर्चना पाटील यांनी दर्शन घेतले. भाविकांसोबत संवाद साधून महाप्रसाद घेतला..देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन पाटील यांनी या  निमित्ताने केले..
यावेळी याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, अभय चालुक्य,  दिलीपसिंग गौतम, आकांक्षा चौगुले यांनी ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारास आपले अमूल्य मत द्यावे असे आवाहन केले..

Previous Post

तू कोणाला जॅक देऊन, टॉमी देऊन लागली का नोकरी?-मल्हार पाटील यांचा ओमराजे यांना सवाल

Next Post

डॉ.पद्मसिंह पाटील यांनी उमरगा-औसा भागात केलेल्या कामामुळे माझा विजय निश्चित-अर्चनाताई पाटील

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
डॉ.पद्मसिंह पाटील यांनी उमरगा-औसा भागात केलेल्या कामामुळे माझा विजय निश्चित-अर्चनाताई पाटील

डॉ.पद्मसिंह पाटील यांनी उमरगा-औसा भागात केलेल्या कामामुळे माझा विजय निश्चित-अर्चनाताई पाटील

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491307
Users Today : 6
Users Yesterday : 61
This Month : 697
Total Users : 38672
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group