Sunday, September 13, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

Rajkiy Katta by Rajkiy Katta
5 November 2025
in Blog
0
धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
0
SHARES
257
VIEWS

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे व पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस रविंद्र पवार, राज्याचे सरचिटणीस बबन कनावजे, ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची चर्चा होती. या संदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन जिल्हा संघटनेत बदल करण्याची मागणी केली होती. त्या बैठकीनंतर पक्षाने तात्काळ निर्णय घेत, सक्रिय आणि सर्वसमावेशक नेतृत्वासाठी ओळख असलेल्या डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळणार आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

“जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम करणार आहे. महाविकास आघाडी घटक पक्षांशी समन्वय साधून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी २४ तास उपलब्ध राहीन.”

डॉ. प्रतापसिंह पाटील
नूतन जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

Previous Post

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Next Post

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

Related Posts

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
Blog

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार

12 September 2026
शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
Blog

शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव

31 August 2026
लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
Blog

लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन

31 August 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

30 August 2026
खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!
Blog

खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

27 August 2026
मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?
Blog

मल्हार पाटील यांच्या खेळीने ओमराजेंसमोर नवे आव्हान,शिवसेनेचे पाच नगरसेवक भाजपकडे जाण्याची शक्यता?

24 August 2026
Next Post
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

Recent Posts

  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलू नये-आ.रोहित पवार
  • शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात धाराशिव जिल्हा युवा महोत्सव
  • लेकीच्या एमबीबीएस प्रवेशाचा आनंद… अवघ्या चार तासांत काळाचा घाला; शिक्षक आप्पासाहेब मुळे यांचे आकस्मिक निधन
  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
  • खा.ओमराजेंनी रात्रीत गेम फिरवला; भाजपच्या वाटेवरील नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

Recent Comments

No comments to show.

Counter

491244
Users Today : 4
Users Yesterday : 89
This Month : 634
Total Users : 38609
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group