Monday, March 23, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

धाराशिव लोकसभेसाठी ओमराजे अर्चनाताई व आंधळकर यांच्या तिरंगी लढत

Rajkiy Katta by Rajkiy Katta
25 April 2024
in Blog
0
धाराशिव लोकसभेसाठी ओमराजे अर्चनाताई व आंधळकर यांच्या तिरंगी लढत
0
SHARES
83
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

देशात  १८ व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे.  उद्या राज्यातील दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे.  धाराशिव लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्यात मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे.  या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बसपा, शेतकरी संघटना आदी पक्षांसह अपक्ष असे ३१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराकडून आपल्याकडे मतदान खेचून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मतदारसंघातील नवमतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे महत्वपूर्ण ठरणार आहे.  

धारशिवा मध्ये २०१९ च्या लोकसभा  निवडणुकीसाठी १८ लाख ८६ हजार २३८ मतदार होते. या तुलनेत सन २०२४ च्या निवडणुकीत त्यात १९ लाख ९२ हजार ७३७ अशी  वाढ झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी प्रथमच १ लाख ६ हजार ४९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे हे नवमतदार कोणाला कौल देणार यावरही निकालाची बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

धाराशिव लोकसभेसाठी २०१९ मध्ये ६३.४२ टक्के इतके मतदान झाले होते. तर १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतांची विभागणी होणार का हेही पाहावे लागणार आहे. २०१९ च्या लोकसभेसाठी १८ लाख ८६ हजार २३८ मतदारांपैकी ११ लाख ९६ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०२४ मध्ये १ लाख ६ हजार ४९९ मतदारसंख्या वाढली आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडते, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. धाराशिव लोकसभेसाठी २००९ मध्ये ५४.४७ टक्के, २०१४ मध्ये ६४.४१ टक्के तर २०१९ मध्ये ६३.४२ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ११ लाख १५ हजार ९९१ इतके मतदान झाले असून २०१९ मध्ये ११ लाख ९६ हजार १६६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मविआकडून विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महायुतीकडून अर्चना पाटील तर वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रातील भाजप सरकारने युवकांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा विचार करता नवमतदार आणि युवकांचा कौल महायुतीच्या म्हणजे अर्चना पाटील यांच्या बाजूने असेल अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

Previous Post

30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये अर्चनाताई पाटील यांच्याकरिता सभा घेणार-मल्हार पाटील यांची माहिती

Next Post

खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केले ते अगोदर सांगावे -आ.राणाजगजिसिंह पाटील

Related Posts

Blog

युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान

21 March 2026
जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
Blog

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

21 March 2026
माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
Blog

माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम

21 March 2026
भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
Blog

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

19 March 2026
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
Blog

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

18 March 2026
तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत
Blog

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

15 March 2026
Next Post
खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केले ते अगोदर सांगावे -आ.राणाजगजिसिंह पाटील

खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केले ते अगोदर सांगावे -आ.राणाजगजिसिंह पाटील

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483517
Users Today : 48
Users Yesterday : 40
This Month : 1197
Total Users : 30882
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group