Saturday, March 21, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री डॉ.तानाजी सावंत ओक्साबोक्सी रडले

Rajkiy Katta by Rajkiy Katta
30 July 2024
in Blog
0
आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री डॉ.तानाजी सावंत ओक्साबोक्सी रडले
0
SHARES
172
VIEWS

                      महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू सुभाष सावंत यांचे परवा दुःखद निधन झाले. ही वार्ता समजल्याबरोबर डॉ.तानाजी सावंत ताबडतोब गावी आले आणि आपल्या भावाचं पार्थिव पाहून अक्षरशः ओक्साबोक्सी  रडले. अंत्यविधीच्या प्रसंगी पार्थिवाला अग्नी देताच ते जागेवरून उठले आणि धावतच चितेकडे गेले आणि मोठमोठयाने रडू लागले.हे पाहून सर्वजन सद्गदित झाले. प्रा.तानाजी सावंत  यांना एकूण पाच भावंड आणि एक बहीण यामध्ये प्रा.तानाजी  सावंत हे सर्वात धाकटे अर्थात शेंडेफळ आहेत. पाच भावंड म्हणजे पाच पांडवांसारखे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे. पाच भावांचा एकमेकावर प्रचंड जीव आहे. त्यांचे बंधुप्रेम हे वाखाण्यासारखे आणि प्रेरणादायक आहे. ते संस्कार त्यांच्या पुढच्या पिढीवर अर्थात त्यांच्या सगळ्या मुलांवरतीदेखील आहेत. 

 प्रत्येक भावाच्या गळा पडून डॉ.तानाजी सावंत  रडत होते. भावाच्या आठवणीने ते अत्यंत व्याकुळ झाले होते. तिसऱ्या दिवशी सावडण्याच्या वेळेसदेखील ते हुंदके देऊन रडत होते. मातीच्या कार्यक्रमानंतर ते ज्यावेळेस जायला निघाले त्यावेळेस गाडीत बसेपर्यंत ते आपल्या सर्व भावांच्या गळ्यात पडून रडत होते. दिवंगत बंधूच्या आठवणीने ते अत्यंत व्याकूळ झाले होते.

प्रा.डॉ.तानाजी सावंत हे महाराष्ट्रातील एक परखड आणि सडेतोड बोलणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे.पण सडेतोड बोलणारे, परखड बोलणारे लोकच जास्त भावनिक आणि प्रेमळ असतात, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. आपण कितीही मोठे झालो तरी आई, वडील आणि भावांवर कसे प्रेम करावे, तीन-तीन पिढ्या एकत्र कसे रहावे.याचा वस्तुपाठ सावंत परिवाराकडून घेतला पाहिजे. डॉ.तानाजी सावंत जेवढे परखड तेवढेच हळवे आहेत हेच दिसून आले.

Previous Post

धाराशिव येथील वर्ग-२ जमिनीचा विषय मार्गी लावण्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला शब्द

Next Post

भाजपा नेते सुधीर पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

Related Posts

Blog

युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान

21 March 2026
जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
Blog

जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली

21 March 2026
माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
Blog

माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम

21 March 2026
भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
Blog

भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव

19 March 2026
शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे  धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
Blog

शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

18 March 2026
तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत
Blog

तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर घेऊन जाण्याची दानत असलेले व्यक्तिमत्व : प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

15 March 2026
Next Post
भाजपा नेते सुधीर पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

भाजपा नेते सुधीर पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483420
Users Today : 130
Users Yesterday : 67
This Month : 1100
Total Users : 30785
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group