धाराशिव : जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाचे एकूण 15 सदस्य निवडून आले असून, त्यामध्ये तेरखेडा जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या नावाची शिवसेना गटनेतेपदासाठी जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही निवड मुख्यमंत्री Eknath Shinde व पालकमंत्री Pratap Sarnaik यांच्या सहमतीने, तसेच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार Tanaji Sawant यांच्या मार्गदर्शनाखाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना पक्षासाठी महत्त्वाचे मानले जाणारे गटनेतेपद तेरखेडा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या विकी उर्फ संदेश चव्हाण यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने उत्सुकता वाढली आहे.
भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून सर्व सूत्र आल्याची माहिती असून त्यांचे विश्वासू शिलेदार तेरखेडा जिल्हा परिषद गटातून दिग्गज नेते बिभीषण खामकर यांना पराभूत करून विजयी झालेले विकी उर्फ संदेश चव्हाण यांना गटनेतेपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूण आठ जिल्हा परिषद सदस्य भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले असून यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. यामध्ये पारगाव गटातून सविता तळेकर,पारा गटातून अश्विनी उंदरे,आष्टा गटातून साधना अंधारे,वालवड गटातून जयश्री काळे,सुकटा गटातून विजयमला मारकड,आनाळा गटातून वैशाली डोके या निवडून आल्या आहेत. तर दोन पुरुष निवडून आले असून यामध्ये तेरखेडा जिल्हा परिषद गटातून संदेश चव्हाण तर शेळगाव गटातून ॲड.अमर मोरे हे निवडून आले आहेत.
शिवसेनेतील धाराशिव जिल्ह्यातील सर्व मुख्य नेत्यांची काल बैठक मुंबई येथे पार पडली असून यामध्ये संदेश उर्फ विकी चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजले आहे.












Users Today : 21
Users Yesterday : 139
This Month : 1130
Total Users : 30815