भूम राजकीय कट्टा वृत्तसेवा-
आरोग्य क्षेत्रात भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात कार्य केलेले व विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता निर्माण झाली होती असे डॉ. राहुल घुले यांचा उद्या शिवसेना पक्षात प्रवेश होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते पुणे येथे ते प्रवेश करणार असून त्यांना कोणता राजकीय शब्द दिला याची मात्र माहिती अद्याप मिळालेली नाही.

भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षभरापासून सातत्याने त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती मात्र ते आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ना.डॉ.तानाजी सावंत यांच्या समवेत काम करणार असल्यामुळे पुढील राजकीय दिशा काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.ते उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह पुणे येथे शिवसेना शिंदे गट गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252