शिवसेना राज्य समन्वयक तथा शिवसेना जिल्हा निरीक्षक नितीन लांडगे यांची माहिती
धाराशिव प्रतिनिधी-
धाराशिव येथे 29 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शिवसेना राज्य समन्वयक तथा शिवसेना जिल्हा निरीक्षक नितीन लांडगे यांनी दिली आहे.या मेळाव्यात राज्यातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून किमान 25 ते 30 हजार तरुणांना नोकऱ्या राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यातून मिळणार आहेत तरी बेरोजगार तरुणांनी या महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील नितीन लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

धाराशिवला असा महारोजगार मेळावा हा प्रथमच होत असून यापूर्वी हा मेळावा विभागीयस्तरावर झालेला आहे. मात्र नितीन लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन धाराशिव येथील बेरोजगारी कमी करण्याकरिता नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्या विनंतीला अनुसरून हा महारोजगार मेळावा आयोजित केल्याचे त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.











Users Today : 59
Users Yesterday : 81
This Month : 1716
Total Users : 27144