शिवसेनेचे मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,युवासेना सचिव राहुल लोंढे,मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये युवासेना मराठवाडा निरीक्षकपदी अविनाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक व बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हासह संपुर्ण मराठवाड्यातील प्रत्येक युवकांपर्यत युवासेनेचे कार्य पोहचावावे अशी अपेक्षा व्यक्त केली.बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश जाधव यांनी केलेल्या कामाची दखल घेत युवासेना निरीक्षकपदी नियुक्ती झाली.
सर्वांनी अविनाश जाधव यांना युवासेना मराठवाडा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252