भूम राजकीय कट्टा वृत्तसेवा–
परंडा विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असून आता या मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून आरोग्यदूत डॉ.राहुल घुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता डॉ.राहुल घुले हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

डॉ राहुल घुले यांनी गेल्या वर्षभरात आरोग्य सेवेच्या माध्यमातून भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघात आपली एक स्वतःची वेगळी ओळख बनवली असून या मतदारसंघातून ते आता निवडणूक लढवणार असल्याने या मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून 2004,2009 व 2014 या तीनही विधानसभा निवडणुका लढवल्या असून या मतदार संघातून त्यांनी दखलपात्र मत घेतली आहेत तर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे डॉ.राहुल घुले या मतदारसंघातून चमत्कार करणार का याकडे लक्ष लागले आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ.राहुल घुले यांना उमेदवारी जाहीर
भूम राजकीय कट्टा वृत्तसेवा
परंडा विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असून आता या मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून आरोग्यदूत डॉ.राहुल घुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता डॉ.राहुल घुले हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
डॉ राहुल घुले यांनी गेल्या वर्षभरात आरोग्य सेवेच्या माध्यमातून भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघात आपली एक स्वतःची वेगळी ओळख बनवली असून या मतदारसंघातून ते आता निवडणूक लढवणार असल्याने या मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून 2004,2009 व 2014 या तीनही विधानसभा निवडणुका लढवल्या असून या मतदार संघातून त्यांनी दखलपात्र मत घेतली आहेत तर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे डॉ.राहुल घुले या मतदारसंघातून चमत्कार करणार का याकडे लक्ष लागले आहे.

Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252